जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मोठी बातमी! हातात बंदूक घेऊन तरुण बागेश्वर धाममध्ये घुसला; परिक्रमा मार्गावर पोहोचला अन्...

मोठी बातमी! हातात बंदूक घेऊन तरुण बागेश्वर धाममध्ये घुसला; परिक्रमा मार्गावर पोहोचला अन्...

बंदूकधारी तरुण बागेश्वर धाममध्ये घुसला

बंदूकधारी तरुण बागेश्वर धाममध्ये घुसला

मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बागेश्वरधाममध्ये एक तरुण हातात बंदूक घेऊन घुसल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

छतपूर, 20 जून : मध्यप्रदेशमधील छतपूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रसिद्ध बागेश्वर धाममध्ये एक तरुण पिस्तुल घेऊन घुसला. हा तरुण हातात पिस्तुल घेऊन परिक्रमा मार्गावर फिरत होता. या शस्त्रधारी तरुणाला पाहून लोकांमध्ये दहशत पसरली, चांगलीच धावपळ उडाली. तिथे उपस्थित असलेल्या भाविकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलील घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाला अटक करण्यात आली आहे. चौकशी सुरू घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक तरुण हातात खुलेआम पिस्तूल घेऊन बागेश्वर धाममध्ये घुसला. हा तरुण हातात पिस्तुल घेऊन परिक्रमा मार्गावर फिरत होता. या तरुणाला पाहून भाविकांमध्ये खळबळ उडाली. तिथे उपस्थित असलेल्या काही जणांनी याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतलं. हा तरुण कोण आहे, त्याच्याकडे पिस्तुल कसं आलं तो बागेश्वर धाममध्ये कसा घुसला याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर हा तरुण हातात पिस्तुल घेऊन थेट बागेश्वर धाममध्ये घुसल्यानं सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हा तरुण हातात पिस्तुल घेऊन खुलेआमपणे परिक्रमा मार्गावर फिरत होता. तिथे उपस्थित असलेल्या भाविकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांकडून आता या तरुणाची चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात