मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मोनोपली गेम खेळताना वाद विकोपाला; सावत्र भाऊ-बहिणीच्या मागे पिस्तूल घेऊन धावला मुलगा; अन्...

मोनोपली गेम खेळताना वाद विकोपाला; सावत्र भाऊ-बहिणीच्या मागे पिस्तूल घेऊन धावला मुलगा; अन्...

मोनोपली गेम खेळताना वाद विकोपाला

मोनोपली गेम खेळताना वाद विकोपाला

आर्मस्ट्राँग त्याच्या कुटुंबीयांसोबत मोनोपली गेम खेळत होता. त्याचवेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला व याचं रुपांतर हाणामारीत झालं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

अमेरिकेत शाळा किंवा इतर ठिकाणी माथेफिरूंकडून गोळीबार होत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. अगदी क्षुल्लक कारणावरून निष्पात मुलं आणि मोठ्यांना जीव गमवावा लागत आहे. साध्या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळतं. रस्त्यावरच नाही तर कुटुंबांमध्येही असे अनेक वाद घडतात. परंतु, अमेरिकेच्या टुल्सामध्ये मोनोपली गेम खेळताना कौटुंबिक वाद झाला आणि पिस्तूल घेत सावत्र भाऊ-बहिणीच्या मागे एकजण धावत सुटला. त्यानं फायरिंगही केलं. पण निशाणा चुकल्यानं मोठा अनर्थ टळला. ‘आज तक हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

Cleveland19.Com च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील टुल्सामध्ये 27 नोव्हेंबर रोजी कुटुंबातील सदस्य एकत्रित बसून मोनोपली गेम खेळत होते, त्यावेळी आरोपी जॉन आर्मस्ट्राँग आणि त्याच्या सावत्र भावात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. याचे रुपांतर हाणामारीत झालं. हळूहळू त्यांचं भांडण घराबाहेर गेलं. राग अनावर झाल्यानं जॉन आर्मस्ट्राँगने त्याची पिस्तूल बाहेर काढली व तो सावत्र भाऊ-बहिणीच्या मागे धावत सुटला व त्याने फायरिंग सुरू केलं. प्रकरण वाढल्यानंतर आर्मस्ट्राँगच्या सावत्र बहिणीनं इमर्जन्सी क्रमांक 911 वर फोन केला. रागात आर्मस्ट्राँगनं त्याची सावत्र बहीण व वडिलांवर गोळी झाडली. पण निशाणा चुकल्यानं दोघांपैकी कोणालाही गोळी लागली नाही. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेत जॉन आर्मस्ट्राँगला अटक केली.

प्राणघातक हल्ल्याचा आरोप

पिस्तूल घेऊन सावत्र भाऊ-बहिणीच्या मागे धावणाऱ्या आर्मस्ट्राँगवर प्राणघातक हल्ल्याचा आरोप लावण्यात आला. आर्मस्ट्राँगने फायरिंग केलेलं पिस्तूल पोलिसांना घटनास्थळी सापडली नाही. परंतु, मोनोपली गेमसाठी वापरलेले पैसे व गेमचे काही तुकडे तिथं आढळलं. आर्मस्ट्राँगनं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळणार असून, तो लवकर तुरुंगाबाहेर येणार नाही, असं पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा - श्रद्धाच्या हत्याप्रकरणात नवीन अपडेट! आफताबच्या नव्या गर्लफ्रेंडचा वेगळाच खुलासा

गेम खेळत असताना मद्यपान करत होते कुटुंबीय

आर्मस्ट्राँग त्याच्या कुटुंबीयांसोबत मोनोपली गेम खेळत होता. त्याचवेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला व याचं रुपांतर हाणामारीत झालं. पोलिसांच्या माहितीनुसार, मोनोपली गेम खेळताना आर्मस्ट्राँगचे कुटुंबीय मद्यपान करत होते. त्याचवेळी सावत्र भावाशी त्याचा वाद झाला. या भांडणावेळी आर्मस्ट्राँगच्या हातावर जखम झाली. याच कारणावरून त्याला राग आला व त्याने थेट पिस्तूल काढून सावत्र भाऊ-बहिणीचा पाठलाग करत गोळीबार केला. दरम्यान, अलीकडच्या काळात अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढल्या असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. तिथं अगदी सहज हत्यारांची खरेदी केली जाते. हत्यार जवळ असलं की, अगदी क्षुल्लक कारणावरूनही वाद झाल्यास त्या हत्यारांचा वापर केला जातो. वाढत्या गुन्ह्यांना आवरण्यासाठी अमेरिकेत हत्यारांवर निर्बंध घालायला हवेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

First published:

Tags: Crime