मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

माझं तुझ्यावर प्रेम, लग्न करायचंय.. तरुणीने नकार दिला तर त्याने थेट..

माझं तुझ्यावर प्रेम, लग्न करायचंय.. तरुणीने नकार दिला तर त्याने थेट..

गावात राहणाऱ्या बबलूने घरात घुसून बहिणीवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

गावात राहणाऱ्या बबलूने घरात घुसून बहिणीवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

गावात राहणाऱ्या बबलूने घरात घुसून बहिणीवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India
  • Published by:  News18 Desk

मध्यप्रदेश, 30 ऑगस्ट : एकतर्फी प्रेमातून अनेक विचित्र घटना घडल्याचे तुम्ही वाचले असेल. आता मध्यप्रदेशात एकतर्फी प्रेमातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने 18 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला केला. त्याने तिच्यावर लग्नाचा दबाव टाकला होता. त्याला या तरुणीने नकार दिल्यावर त्याने रागाच्या भरात तिचा गळ्यावर चाकून वार केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या हल्ल्यानंतर तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. यानंतर या तरुणाने त्याठिकाणाहून पळ काढला. खंडवा जिल्हा रुग्णालयात या तरुणीवर उपचार सुरू आहेत. तिच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

ही घटना खंडव्यातील मुंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. या गावात राहणारा बबलू अनेक दिवसांपासून त्याच गावात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. सोमवारी दुपारी मुलीचे संपूर्ण कुटुंब जवळच्या भामोरी गावात पगडी कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे घरात फक्त एकटी ही तरुणी होती. ही माहिती एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या बबलू या तरुणाला मिळाली होती. त्यामुळे त्याने तरुणीच्या घराची भिंत चढून आत प्रवेश केला. तसेच तिने लग्नास नकार दिल्याने तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले.

आरोपी तरुणाला नुकतीच अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी पीडित मुलीला रोज त्रास देत असे. त्याला ड्रग्जचे व्यसन आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाचा समज देण्यात आली होती. तर त्याचा बदला त्याने या मुलीवर हल्ला करुन काढला, असा आरोपी मुलीच्या वडिलांनी केला आहे.

हेही वाचा - मुस्लीम पत्नीने जबरदस्तीने गोमांस खाऊ घातल्याने हिंदू पतीची आत्महत्या, आता पोलिसांनी उचललं मोठं पाऊल 

त्याचवेळी जखमी मुलीच्या बहिणीने आरोप केला आहे की, सोमवारी कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी भमौरी मावशीच्या घरी गेले होते. त्यावेळी मी बहिणीसोबत घरी उपस्थित होती. यावेळी गावात राहणाऱ्या बबलूने घरात घुसून बहिणीवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. माझे तुझ्यावर प्रेम असून लग्न करायचे आहे, असे आरोपीने सांगितले. बहिणीने नकार दिल्याने बबलूने तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. तसेच त्याने बहिणीचा गळ्यावर चाकूने वार केले आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh