जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / स्कूल बसचालकाचा तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत बलात्कार, विद्यार्थिनी झाली गर्भवती अन्

स्कूल बसचालकाचा तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत बलात्कार, विद्यार्थिनी झाली गर्भवती अन्

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तरुणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याने तरुणीवर बलात्कार केला.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

वाराणसी, 14 ऑगस्ट : एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका स्कूल बस चालकाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीवर बलात्कार केला. तसेच ती गर्भवती राहिल्यानंतर बेकायदेशीररित्या तरुणीचा गर्भपात करण्यासाठी तिला एका नर्सिंग होममध्ये नेले. यावेळी तिचा मृत्यू झाला. प्रद्युम्न यादव असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. काय आहे संपूर्ण प्रकरण - हे प्रकरण वाराणसीच्या चोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. वाराणसी जिल्ह्यातील चोलापूर भागातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय तरुणीच्या आईचा मृत्यू झाल्याने ती तिच्या मामाकडे राहायची. सारनाथच्या अकाठा येथील रहिवासी असलेला प्रद्युम्न यादव हा एका खासगी शाळेच्या बसचा चालक आहे. कॉलेजला जाताना-येतानाच्या दरम्यान, तरुणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याने तरुणीवर बलात्कार केला. यातून ही तरुणी गरोदर राहिल्यावर प्रद्युम्नने तिला नवापुरा येथील गणेश-लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यासाठी नेले. रुग्णालयाच्या संचालक शीला पटेल आणि डॉ.लल्लन पटेल यांनी तिचा गर्भपात करत असताना तिचा मृत्यू झाला. गर्भपात करताना मुलीचा मृत्यू झाल्यानंतर प्रद्युम्न यादवने त्याचा मित्र अनुराग चौबे सोबत तिला दुसऱ्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मुलगी मृत झाल्याचे सांगत तिला दाखल करण्यास नकार दिला. यानंतर मृतदेह लपवण्याच्या प्रयत्नात प्रद्युम्नने पुन्हा मित्रासह नवापुरा येथील गणेश-लक्ष्मी हॉस्पिटल गाठले. तोपर्यंत गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाली होती. हेही वाचा -  घरातील दारूचा स्टॉक पत्नीने संपवला; पतीचा संताप, सकाळी मृतदेह रिक्षेत भरला अन्…

गावकऱ्यांच्या माहितीवरून नातेवाईकही पोहोचले आणि प्रकरण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात स्कूल बसचा चालक आणि नर्सिंग होमच्या ऑपरेटरला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात