जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / दिव्यांग आईला मारहाण करत होता दारुड्या मुलगा, रागाच्या भरात लहान भावानं उचललं टोकाचं पाऊल

दिव्यांग आईला मारहाण करत होता दारुड्या मुलगा, रागाच्या भरात लहान भावानं उचललं टोकाचं पाऊल

क्राईम स्टोरी

क्राईम स्टोरी

या घटनेने संपूर्ण परिसरच हादरला आहे.

  • -MIN READ Local18 Pilibhit,Uttar Pradesh
  • Last Updated :

सय्यद कयम रजा, प्रतिनिधी पीलीभीत, 17 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनाही वाढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून लहान भावाने फावड्याने मोठ्या भावाची हत्या केली आहे. या घटनेने उत्तरप्रदेश राज्यातील पीलीभीतमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर याबाबतची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. ही धक्कादायक घटना पीलीभीतमधील पूरनपुर नगरच्या अहमदनगर परिसरातील सांगितली जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

येथे इकबाल नावाच्या व्यक्तीच्या घरात घाटमपूर येथील रजी अहमद मुन्ने आपली आई सलमा बेगम आणि लहान भाऊ फसी अहमद, बहीण गुलवाहर आणि रुखसार सोबत भाड्याने राहत होता. रजी अहमद हा दारूड्या होता. त्याला दारुचे व्यसन होते. तसेच तो आपल्या आईला मारहाण करायचा. लहान भावाला कामाचे पैसे न मिळाल्याने घरातील लोकांनी 4 दिवसांपासून जेवण केले नव्हते. लहान भाऊ हा मजूरी करुन आपल्यासह आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता. त्यांची आई ही दिव्यांग होती. त्यामुळे तिने आपल्या मोठ्या मुलाला पैसे नसल्याबाबत सांगितले. यामुळे रजी अहमद नावाच्या या तरुणाने आपल्या आईला मारहाण केली त्याची बहीण रुखसार तिचा बचाव करत राहिली. मात्र, रजी अहमदने आईला जोरदार मारहाण केली. यावेळी आईला मारहाण होत असल्याचे पाहून लहान मुलगा फसी अहमदने रागाच्या भरात फावडा उचलला आणि फावड्याने त्याच्यावर वार करत त्याची हत्या केली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली तसेच मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी झाली. याबाबतची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात