जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Yavatmal Crime: एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचलं मग चाकूने केले सपासप वार, घटनेने यवतमाळ हादरलं

Yavatmal Crime: एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचलं मग चाकूने केले सपासप वार, घटनेने यवतमाळ हादरलं

यवतमाळ हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या, आधी दगडाने ठेचलं मग चाकूने केले सपासप वार

यवतमाळ हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या, आधी दगडाने ठेचलं मग चाकूने केले सपासप वार

Yavatmal crime news: एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 3 मार्च : एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची निर्घृण हत्या (girl brutally killed) केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये (Yavatmal) घडली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वत:वर देखील धारदार शस्त्राने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रकार घडला आहे. आरोपी तरुण सुद्धा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आधी दगडाने ठेचलं मग चाकूने केले सपासप वार आरोपी तरुणाचं मृतक तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. आरोपी तरुणाचे नाव शुभम असं असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरुणाने मुलीला एमआयडीसी परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर मुलीवर दगडाने हल्ला केला. दगडाने ठेचल्यावर आरोपी शुभम याने तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. वाचा :  पैसे न दिल्याने संतापला; रागात ठेकेदाराच्या पाठीतच स्क्रू ड्रायव्हर खुपसला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम याचं मृतक तरुणीवर प्रेम होतं. एकतर्फी प्रेमात तो वेडा झाला होता. या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते असा संशय शुभमला होता. यानंतर शुभमने तिला एमआयडीसी परिसरात भेटायला बोलावले आणि मग तिच्यावर हल्ला केला. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी शुभम याने देखील स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. शुभम याने स्वत:वर देखील चाकूने वार केले. शुभम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. वाचा :  लग्नानंतर काही दिवसांत पत्नी गरोदर; डॉक्टरकडे नेताच झाला धक्कादायक खुलासा त्या परिसरातील नागरिकांनी एक तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं आणि त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तरुणीचा मृत्यू झाला होता तर आरोपी शुभम हा जखमी अवस्थेत होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शुभम याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. पुण्यात पैशांसाठी सासरच्यांनी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 23 वर्षीय विवाहितेला तिच्या सासरच्या कुटुंबानं फरसी पुसण्याचं अ‍ॅसिड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेत पीडित विवाहितेला इजा झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात