मुंबई, 12 मार्च: मुंबईतील एका बॉक्सिंग कोचने (Boxing Coach) 14 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित पीडित मुलगी आरोपीकडे बॉक्सिंग कोचकडे बॉक्सिंग शिकायला जात होती. यावेळी आरोपीने बॉक्सिंग शिकवायच्या बहाण्याने पीडित मुलीला क्लबमध्ये घेवून गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. पीडितेच्या पालकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपी कोचला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कोचला चेंबर जवळील वाशी नाका परिसरातून अटक केली आहे. फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, गेल्या रविवारी आरोपीने 14 वर्षीय पीडित बॉक्सिंग विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. नराधम एवढ्यावरचं थांबला नाही, तर घटनेची वाच्यता केल्यास बॉक्सिंग करियर उद्धवस्त करण्याची धमकीही आरोपी कोचने दिली आहे. याप्रकरणी मुलीने काही दिवस गप्प राहिल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी आरोपी कोच विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
खरंतर पीडित मुलगी बॉक्सिंगमध्ये करीयर करू इच्छित होती. त्यामुळे तिच्या पालकांनी संबंधित बॉक्सिंग कोचकडे पाठवलं होतं. आरोपी कोचने काऊन्सलिंग करण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घरी बोलावलं. त्यानंतर आरोपीने बॉक्सिंग शिकवण्याच्या बहाण्याने तिला मुलुंड येथील एका क्लबमध्ये घेवून गेले. त्याठिकाणी आरोपीने संबंधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच घटनेची वाच्यता कुठेही केली, तर बॉक्सिंग करीयर उद्धवस्त करेल, अशी धमकीही आरोपी कोचने पीडित विद्यार्थिनीला दिली.
हे ही वाचा -अकोला हादरलं! मुलीच्या नावावर जमीन केल्यानंतरही आईची दगडावर आपटून केली हत्या
यानंतर पीडित मुलगी काही दिवस गप्प बसली, पण त्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी बॉक्सिंग कोचला चेंबरजवळील वाशी नाका परिसरातून अटक केली आहे. आरोपीवर पोक्सो आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coach, Crime news, Rape, Sexual assault, Sexual harassment