जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सुशील कुमारच्या अडचणीत भर, दिल्लीच्या व्यापाऱ्याने केला गंभीर आरोप

सुशील कुमारच्या अडचणीत भर, दिल्लीच्या व्यापाऱ्याने केला गंभीर आरोप

सुशील कुमारच्या अडचणीत भर, दिल्लीच्या व्यापाऱ्याने केला गंभीर आरोप

ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) सध्या ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात (Sagar Dhankhar Murder case) अटकेत आहे. त्याच्या अडचणीमध्ये रोज वाढ होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 मे: ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) सध्या ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात (Sagar Dhankhar Murder case) अटकेत आहे. त्याच्या अडचणीमध्ये रोज वाढ होत आहे. सुशीलवर यापूर्वी गँगस्टरशी संबंध असल्याचा आरोप यापूर्वी झाला आहे. त्यापाठोपाठ दिल्लीतील एका दुकानदाराने (Shopkeeper) सुशीलवर रविवारी गंभीर आरोप केला आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये धान्य पुरवल्याबद्दल चार लाखांचे बिल देण्याची मागणी केल्यानंतर सुशील आणि त्याच्या सहकाऱ्याने आपल्याला मारहाण केली,’ असा आरोप या दुकानदाराने केला आहे. ‘टाईम्स नाऊ’ ने हे वृत्त दिले आहे.  ‘या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. या सर्व घटनेनंतर आपण घाबरलो होतो, असे त्यांनी सांगितले.  सुशील आणि त्याच्या मित्रांना सागर धनखड हत्या  प्रकरणात अटक झाल्यानंतर या व्यापाऱ्याने पुन्हा एकदा हा आरोप केला आहे. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 4 मे रोजी एक फ्लॅटमधून सागर आणि त्याच्या मित्रांचं अपहरण केलं. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. सागर आणि त्याच्या दोन मित्रांना अर्धमेले होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीच्या वेळी सुशील कुमार देखील उपस्थित होता, असे या घटनेच्या CCTV फुटेजवरुन उघड झाले आहे. सुशांतच्या नोकरांची NCB कडून चौकशी, सिद्धार्थ पिठाणीच्या अटकेनंतर कारवाईला आला वेग या संपूर्ण प्रकरणात सुशीलला मदत करणाऱ्या आणखी व्यक्तींचा दिल्ली पोलीस सध्या शोध घेत आहेत. सुशील कुमारवर कलम 302 (हत्या), 365 (अपहरण), 120-B (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. दिल्ली कोर्टाने शनिवारी त्याची चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात