जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Live in पार्टनरसोबत 8 वर्षात 14 वेळा गर्भपात; संतापलेल्या महिलेची आत्महत्या

Live in पार्टनरसोबत 8 वर्षात 14 वेळा गर्भपात; संतापलेल्या महिलेची आत्महत्या

Girl

Girl

विशेष म्हणजे यासाठी महिलेला जबरदस्ती करण्यात आली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जुलै : साउथ-इस्ट दिल्लीच्या (Delhi News) जैतपुरमध्ये एका महिलेच्या आत्महत्येचं वृत्त आहे. 33 वर्षीय महिला गेल्या 8 वर्षांपासून लिव्ह-इन-पार्टनरसोबत राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने लिव्ह-इनमध्ये (Live in Relation) राहत असताना गेल्या 8 वर्षात तब्बल 14 वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे यासाठी महिलेला जबरदस्ती करण्यात आली होती. यामुळे संतापलेल्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणाबाबत माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी लिव्ह इनमधील आरोपीविरोधात बलात्कार, जबरदस्ती गर्भपात करण्यासह आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला 5 जुलै रोजी जैतपूरमध्ये एका घरात लटकलेल्या अवस्थेत दिसली. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यादरम्यान तिची सुसाइड नोटही सापडली. यात तिने लिहिलं आहे की, गेल्या 8 वर्षांपासून मी गौतम कुमार सिंह नावाच्या व्यक्तीसोबत राहत होते. त्याने लग्नाचं आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले. आणि शेवटी लग्नास नकार दिला. यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचं तिने आपल्या सुसाइड नोटमध्ये नमूद केलं आहे. पतीपासून वेगळी राहत होती महिला… घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. पोलीस या प्रकरणात आरोपीचा शोध घेत आहे. सुसाइड नोटमध्ये दिल्यानुसार गेल्या 8 वर्षात तिचा जबरदस्तीने 14 वेळा गर्भपात करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या भावाने पोलिसांना सांगितलं की, त्यांना आरोपीबाबत फार माहिती नाही. पुढे महिलेच्या भावाने सांगितलं की, माझ्या बहिणीला दोन मुली आहेत. यातील एक मुलगी 14 तर दुसरी 12 वर्षांची आहे. त्या दोघीही हॉस्टेलमध्ये राहत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात