सांगली, 2 मे : मिरज तालुक्यातील एका विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली होती. यानंतर या विवाहितेच्या आत्महत्येमुळे माहेरची मंडळी संतप्त झाली होती. या संतप्त झालेल्या माहेरच्या लोकांनी पतीच्या घरासमोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं काय झालं - आरती अभिनंदन तळदंगे या 26 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना मिरज तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथे घडली. या महिलेचे माहेर कर्नाटकातील अथणी तालुक्यातील केंपवाड येथील होते. 10 वर्षांपूर्वी तिचे लग्न अभिनंदन याच्याशी झाले होते. पैशाच्या मागणीसाठी पती व सासऱ्यांनी तिचा छळ केला. त्यामुळे तिला आत्मत्या करावी लागली, असा आरोप मृत आरती तळदंगे हिच्या नातेवाईकांनी केला आहे. आरतीच्या आत्महत्येनंतर तिचे नातेवाईक अत्यंत संतप्त झाले. यानंतर माहेरच्या मंडळींनी मुलीचा पती अभिनंदन याच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी पती व सासऱ्याला वेळीच ताब्यात घेतले. तर या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हेही वाचा - घशातील खवखवीमुळे चाचणी केली तर पतीला Last stage Cancer, दाम्पत्याचं धक्कादायक पाऊल
छोटे कपडे घालते, म्हणून भररस्त्यात तरुणीला मारहाण -
दरम्यान, तालपुरी कॉलनीतील पारिजात ब्लॉकमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला भररस्त्यात मारहाण केल्याचा (Chhattisgarh News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने हे कृत्य केलं आहे. आरोपीचं म्हणणं आहे की, तरुणी छोटे-छोटे कपडे घालून फिरते. ज्यामुळे कॉलनीतील स्थिती बिघडत आहे. यावरुन आरोपीने तरुणीला शिव्या देत मारहाण केली. घटनेच्या तक्रारीवर भिलाई नगर पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली आहे.