Home /News /crime /

हृदयद्रावक! सॉरी बाबा, सासरी येऊन मी चूक केली; व्हिडिओ शेअर करत तरुणीची आत्महत्या

हृदयद्रावक! सॉरी बाबा, सासरी येऊन मी चूक केली; व्हिडिओ शेअर करत तरुणीची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी (Sucidie) या महिलेनं आधी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ (Shocking Video Viral on Social Media) शेअर केला आणि यानंतर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

    रांची 21 मे : देशभरात कोरोनानं (Coronavirus) हाहाकार घातलेला असतानाच एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत एका रेल्वे कर्मचाऱ्याचा पत्नीचा मृतदेह घरामधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. आत्महत्येपूर्वी (Sucidie) या महिलेनं आधी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ (Shocking Video Viral on Social Media) शेअर केला आणि यानंतर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. हा व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये तरुणी रडत-रडत सांगत आहे, की सासरचे लोक तिचा छळ (Harassment for Dowry) करतात. ही घटना झारखंडच्या धनबाद येथील धनसार ठाणा क्षेत्रातील महावीर नगर भूदा येथील आहे. बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्याची पत्नी कोमल पटेल या 21 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. या व्हायरल व्हिडिओमध्ये कोमल रडत-रडत आपली व्यथा मांडत आहे. ती यात म्हणते, की मी आत्महत्या करत आहे. सासरी येऊन मी चूक केली. सॉरी बाबा, मी तुमचं ऐकायला हवं होतं. मला असं वाटलं, की माझा पती आता सुधारला आहे. मात्र, त्यानं पुन्हा मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मरण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या. कोमलचे हे शब्द शेवटचे ठरले. शवविच्छेदनानंतर कोमलचा मृतदेह माहेरी पाठवताच तिच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कोमलची आई आणि बहिणीनं जीवाच्या आकांतानं ओरडत कोमलचा पती अलोकला शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. उपस्थित इतर लोकांनीही तिला न्याय मिळवून देण्याची मागणी लावून धरली. या घटनेनंतर मृत कोमलचे वडील उमेश प्रसाद यांनी धनसर ठाण्यात कोमलचा पती अलोक प्रसाद, अलोकची आई, बहिण यांच्याविरोधात हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितलं, की मुलीच्या सासरकडची मंडळी अनेक दिवसांपासून कारची मागणी करत होते. इकडे या घटनेनंतर अलोकसह त्याचं संपूर्ण कुटुंब फरार आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कतरास बाजार येथील रहिवासी उमेश प्रसाद यांनी आपली मुलगी कोमलचा विवाह 2018 मध्ये धनबाद येथील रहिवासी अलोक कुमारसोबत केला होता. लग्नात घरातील सर्व सामानासह दागिने आणि दहा लाख रुपयेही देण्यात आले होते. नातेवाईकांनी सांगितलं, की लग्नानंतर लगेचच कोमलच्या सासरकडच्या लोकांनी तिला मारहाण करण्यास आणि तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Suicide news

    पुढील बातम्या