Home /News /crime /

चंद्रपूर हादरलं! दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाला; मृत्यूचं कारण अस्पष्ट

चंद्रपूर हादरलं! दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाला; मृत्यूचं कारण अस्पष्ट

Representative Image

Representative Image

या महिलेचा शोध घेण्यात येत होता. त्यानुसार या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

    चंद्रपूर, 06 सप्टेंबर: चंद्रपूर जिल्ह्यातील एका बेपत्ता महिलेचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनी सापडला आहे. या महिलेनं शनिवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास वर्धा नदीच्या पुलावरून उडी मारल्याची माहिती स्तहनिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार या महिलेचा शोध घेण्यात येत होता. त्यानुसार या महिलेचा मृतदेह सापडला आहे. घुग्गुस- वणी या मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या पुलावरून एका महिलेनं नदीत उडी घेतल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे या महिलेचा युद्धस्तरावर शोध घेण्यात येत होता. हे वाचा - PUBG च्या नादात तरुणीची आत्महत्या! शहरात आल्यानंतर 15 दिवसांमध्ये लागलं व्यसन पोलिसांकडून रविवारी सकाळी आठ वाजतापासून संध्याकाळीपर्यंत विशेष बचाव पथकाद्वारे या महिलेचा शोध घेण्यात आला होता. मात्र महिलेचा कुठेही पत्ता लागत नव्हता. सोमवारी पुन्हा बचाव पथकाकडून आणि पोलिसांकडून महिलेला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता दुपारच्या सुमारास या महिलेचा मृतदेह नदीच्या घाटाजवळ आढळून आला. सौ. रविता जुनघरी असं या महिलेचं नाव आहे अशी माहिती मिळाली आहे. या महिलेच्या आत्महत्येचं कारण अजूनही स्प्ष्ट नाही. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास कारण्यात येत आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Chandrapur, Crime

    पुढील बातम्या