Home /News /crime /

PUBG च्या नादात तरुणीची आत्महत्या! शहरात आल्यानंतर 15 दिवसांमध्ये लागलं व्यसन

PUBG च्या नादात तरुणीची आत्महत्या! शहरात आल्यानंतर 15 दिवसांमध्ये लागलं व्यसन

ऑनलाईन गेम पबजीच्या (Online Game Pubg) वेडापायी जीव गमावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणी 15 दिवसांपूर्वीच गावातून शहरामध्ये आली होती.

    मुंबई, 6 सप्टेंबर : ऑनलाईन गेम पबजीच्या (Online Game Pubg) वेडापायी जीव गमावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणी 15 दिवसांपूर्वीच गावातून शहरामध्ये आली होती. त्यानंतर तिला ऑनलाईन गेमचं व्यसन लागलं, हा ताण सहन न झाल्यानं तिनं आत्महत्या केली, असा तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे. काय आहे प्रकरण? मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील ही घटना आहे. येथील न्यू गौरी नगर भागातील राधा उर्फ रक्षा  या 20 वर्षांच्या तरुणीनं गळफास लावून आत्महत्या केली. राधा 15 दिवसांपूर्वीच कॉम्पयुटरचा कोर्स करण्यासाठी गावातून इंदूरमध्ये आली होती. त्याचबरोबर ती फर्स्ट इयरमध्ये शिकत होती. राधानं संध्याकाळी तिचा भाऊ संजयला किराणा आणण्यासाठी घराबाहेर पाठवलं होतं. संजय अर्ध्या तासानंतर परत आला त्यावेळी तिनं आत्महत्या केली होती. संजयनं दिलेल्या माहितीनुसार 'राधाला पबजी गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. ती सतत मोबाईलवर हा गेम खेळण्यात मग्न असे. ती गेल्या एक-दोन दिवसांपासून तणावात होती. तिच्या मोबाईलवर कंपनीचे व्हॉट्सअप कॉलही आले होते,' असा दावा संजयनं केला आहे. मुलीने निवडलेल्या पार्टनरला आईचा नकार, दिली भयावह शिक्षा; इतिहासातील सर्वात क्रूर घटना म्हणून आली समोर राधाचा मोबाईल पुढील तपासासाठी पोलिसांना दिला आहे, असंही संजनं सांगितलं. दरम्यान या प्रकरणात सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. राधाचा भाऊ संजय इंदूरमध्ये नोकरी करतो. तर तिची आई मजूरी करते, अशी माहिती आहे. या प्रकरणात कोणतीही सूसाईड नोट सापडलेली नाही. राधाच्या मोबाईलमधील नंबरची पोलीस सध्या तपासणी करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, PUBG, Pubg game, Sucide

    पुढील बातम्या