Home /News /crime /

पत्नीने 50 हजारांत दिली पतीची सुपारी; प्रियकर आणि मुलानेही केली मदत

पत्नीने 50 हजारांत दिली पतीची सुपारी; प्रियकर आणि मुलानेही केली मदत

एका खासगी कंपनीच्या सुपरवायझरची हत्येप्रकरणी (Supervisor) उलगडा झाल्याचा दावा नोएडा पोलिसांनी (Noida Police) रविवारी केला. पोलिसांनी दोन जणांना अटकही केली आहे. पाच दिवसांपूर्वी शहरातील एका ठिकाणी अज्ञात हमलेखोरांनी एका खासगी कंपनीच्या सुपरवायझरवर गोळी (Firing on Private Company Supervisor) झाडली होती.

पुढे वाचा ...
  नोएडा, 16 मे : एका खासगी कंपनीच्या सुपरवायझरच्या हत्येप्रकरणी (Supervisor) उलगडा झाल्याचा दावा नोएडा पोलिसांनी (Noida Police) रविवारी केला. पोलिसांनी दोन जणांना अटकही केली आहे. पाच दिवसांपूर्वी शहरातील एका ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी एका खासगी कंपनीच्या सुपरवायझरवर गोळी (Firing on Private Company Supervisor) झाडली होती. तर या घटनेत सहभागी व्यक्तीच्या पत्नीसोबत इतर दोन जण फरार आहेत. काय आहे नेमके प्रकरण? अप्पर पोलीस उपायुक्त (झोन एक) रणविजय सिंह यांनी सांगितले की, 10 मेला दुपारी सेक्टर 94च्या जवळ ओखला पक्षी अभयारण्यजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी ऋषी पाल शर्मा यांच्यावर गोळी झाडली होती. यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान 14 मेला त्यांचा मृत्यू झाला. सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तपासादरम्यान, अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तपासादरम्यान, पोलिसांच्या हाती आलेल्या पुरावांच्या आधारावर हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या अकील आणि विशाल सिंह यांना अटक करण्यात आली आहे. प्रियकराला सांगितले पतीकडे बरीच संपत्ती... -  त्यांनी सांगितले की, हत्येच्या घटनेत सहभागी शर्मा यांची दुसरी पत्नी पूजा तसेच मेहंदी हसन फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे. चौकशी दरम्यान आरोपी अकीलने सांगितले की, शर्मा यांचा पहिली पत्नी मीनूसोबत घटस्फोट झाला होता. तर दुसरी पत्नी पुजा हिला आधीपासून संतोष नावाच्या व्यक्तीपासून एक मुलगा आहे. त्याचे नाव विशाल सिंह आहे. आरोपी अकील याच्या पत्नीवर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पुजा हीसुद्धा याच रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करते. तेव्हापासून पुजा आणि अकील या दोघांचे प्रेमसंबंध होते. पूजाने अकीलला सांगितले होते की, शर्मा यांच्याकडे बरीच संपत्ती आहे. हेही वाचा - सारखा मारहाण करायचा; संतापलेली पत्नी पतीपेक्षाही झाली क्रूर, दिली भयंकर शिक्षा
  प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट -
  तपासादरम्यान असाही खुलासा झाला आहे की, पूजाने ऋषी पाल यांची बरीच मालमत्ता विकली होती. त्यानंतर उरलेली संपत्ती हडप करण्यासाठी तिने प्रियकर अकील आणि मुलगा विशाल याच्यासोबत मिळून ऋषी पाल यांच्या हत्येचा कट रचला. यासाठी अकील आणि विशालने शार्प शूटर मेहंदी हसनला 50 हजार रुपये दिले. कटाचा एक भाग म्हणून अकीलने 10 मे रोजी त्याच्या मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर माती लावली. यानंतर ती विशाल आणि शार्प शूटर मेहंदी हसनला दिली. त्याच दिवशी हसन याने ऋषि पालवर गोळ्या झाडून तो फरार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्येप्रकरणी विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Delhi Police, Murder news

  पुढील बातम्या