दिल्ली, 15 मे : दिल्लीतील (Delhi News) कालकाजी भागात एका व्यक्तीच्या हत्येचं गूढ पोलिसांनी दोन दिवसात उघड केलं. या व्यक्तीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. दोघांमध्ये (Crime News) अवैध संबंध होतं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोन्ही आरोपींना आपला गुन्हा कबुल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 ने रोजी दिल्लीतील कालकाजी येथे एक व्यक्ती स्वत:च्या घरात बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी व्यक्तीच्या गळ्यावर सुऱ्याने (Killed Husband) वार केल्याचं दिसून आलं. यानंतर पोलिसांच्या क्राइम टीमने घटनास्थळाचा तपास केला.
शेवटी व्यक्तीच्या पत्नीला विचारलं तेव्हा तिने आपल्या गुन्हा कबुल केला. महिलेने सांगितलं की, तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. महिलेने पुढे सांगितलं की, पती तिला खूप मारहाण करीत होता. त्यामुळे रागाच्या भरात महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्याचं कारस्थान रचलं. हत्या केल्यानंतर प्रियकाराने घटनास्थळावरील चाकू, रक्ताने माखलेले कपडे नाल्यात फेकून दिले. महिलेने आपल्या गुन्हा कबुल केल्यानंतर तिच्या प्रियकराचा शोध घेण्यात आला व त्याला अटक करण्यात आली.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.