इंदूर, 24 जुलै : देशात दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्याबरोबर अनैतिक संबंधातून खून केल्याच्या घटनाही समोर येत आहेत. यातच आता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. यानंतर मृतदेह जंगलात नेऊन जाळला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर आरोपीच्या पत्नीला फोनवरून त्रास देत असे, त्यानंतर पतीने तिच्या हत्येचा कट रचला. आरोपीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह जंगलात जाळला इतकेच नाही तर त्याची दुचाकीही खड्ड्यात फेकून दिली. महू तहसीलमधील बरगोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. मांगलिया गावात बुधवारी एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एका महिलेला फोनवरून त्रास देत असे, त्यामुळे महिलेच्या पतीने मित्रांसह तरुणाची हत्या करून मृतदेह जंगलात जाळला. जंगलात मेंढपाळांना एक मृतदेह जळताना दिसला, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मृताची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. हंसराज चौहान असे मृताचे नाव आहे. तो किशनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील कटकट खेडी गावातील रहिवासी आहे. हेही वाचा - 5 वर्षाच्या पुतणीने मागितला आंबा; भडकलेल्या काकाने जे केलं ते वाचूनच उडेल थरकाप ग्रामीणचे पोलीस अधीक्षक भागवत सिंह विरडे यांनी सांगितले की, मृत व्यक्ती महिलेला फोन करत असे, त्यांचे प्रेमसंबंध होते. हा प्रकार महिलेच्या पतीला कळताच त्याने मित्रांसह कुशलगड येथे जात असताना हंसराजच्या डोक्यात काठीने वार करून त्याची हत्या केली. मृतदेह जंगलातील खंदकाखाली जाळला होता. पोलिसांना माहिती मिळू नये म्हणून त्यांची दुचाकी जाम गेटच्या खाली असलेल्या खड्ड्यात फेकली. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.