मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बीडमध्ये 'पुष्पा गॅंग'चा मोरक्या अखेर पकडला, तब्बल 20 लाखांचा ऐवज जप्त

बीडमध्ये 'पुष्पा गॅंग'चा मोरक्या अखेर पकडला, तब्बल 20 लाखांचा ऐवज जप्त

ग्रामीण भागासह शहरी भागातील चंदनाची झाडे चोरून नेत असल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली होती

ग्रामीण भागासह शहरी भागातील चंदनाची झाडे चोरून नेत असल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली होती

ग्रामीण भागासह शहरी भागातील चंदनाची झाडे चोरून नेत असल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली होती

बीड, 24 जुलै : बीडमध्ये चोरीछुप्या मार्गाने चंदनाची तस्करी ( Sandalwood smuggling ) करणारी पुष्पा (pushpa) गॅंग सक्रीय आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील चंदनाची झाडे चोरून नेत असल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली होती. या चंदन तस्करांच्या टोळीच्या मोरक्याला अखेर पकडण्यात बीड पोलिसांना यश आले. बीडच्या महाजनवाडी गावातून,तब्बल 599 किलो चंदनाच्या गाभ्यासह जवळपास 20 लाख 72 हजरांचा ऐवज जप्त केला आहे.

बीडच्या महाजनवाडी गावातील काही जण, चंदनाची तस्करी करत असून त्यांनी शिवारातील शेतातील चंदनाची झाडे चोरून तोडून आणले आहेत आणि आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभा काढून चोरटी विक्री करत आहेत, अशी माहिती आयपीएस कुमावत यांना मिळाली होती.

माहितीवरून पंकज कुमावत यांच्यासह टीमने महाजनवाडी गावात छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा अशोक रामहारी घरत (राहणार, महाजनवाडी) हा आढळून आला. यावेळी त्याच्या घराची झडती घेतली असता, 499 किलो चंदनाचा तासलेला गाभा, लाकडे वजन काटा वाकस, कुऱ्हाडी आणि बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त केला.

दरम्यान, याप्रकरणी चंदन तस्कर अशोक घरत याच्यासह 10 जणांविरुद्ध बीडच्या नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने चंदन तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

बिबट्याची कातडी, खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या 5 जणांना अटक 

दरम्यान, भंडाऱ्यात बिबट्याची कातडी व खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना नागपूर, भंडारा व गोंदिया वन विभागाने विशेष पथक तयार करून अटक केली आहे. निखिल नीलकंठ आगडे, कैलास काशीनाथ घुमके, हेमराज ओंकार उके,मिथुन छबीलाल घुमके आणि मनोज नारद मानकर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून बिबट्याची कातडी एक नग, खवल्या मांजराचे खवले 3.25 किलोग्रॅम, तीन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोंदिया येथे बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार नागपूर आणि गोंदिया वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार केले. दरम्यान सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील जांभळी उपक्षेत्र, डोंगरगाव, खजरी भागात सापळा रचून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध वन्यजीव कायदा 1972 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: