रत्नागिरी, 27 नोव्हेंबर : सेक्सटॉर्शनमुळे अनेकांना भिती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. यातच आता रत्नागिरीतूनही यासंबंधित धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेने तरुणाला मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला आणि तो रेकॉर्ड केल्याची धमकी देत त्याची 50 हजार रुपयात फसवणूक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकण -
रत्नागिरी ग्रामीण पोलीस हद्दीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात महिलेने गुरुवारी या तरुणाला त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला. तसेच यावेळी त्याच्याशी संवाद साधला आणि त्याचा विश्वास संपादन केला. यानंतर या महिलेने या संवादादरम्यान स्वत: नग्न होऊन तरुणाला जाळ्यात अडकवले.
तसेच या तरुणालाही नग्न व्हायला सांगितले आणि त्याला नकळत हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला. यानंतर थोड्या वेळाने एका अज्ञात व्यक्तीने त्याला फोन केला आणि सांगितले की, तुझा व्हिडिओ हा रेकॉर्ड करण्यात आला आहे. तसेच तो यूट्यूबवर टाकला जाईल अशी धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली.
या तरुणाची 50 हजार 500 रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तरुणाने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'सेक्सटॉर्शन' रॅकेटमुळे नवी मुंबईत खळबळ, 72 वर्षांचा नागरिक जाळ्यात अडकला
सेक्सटॉर्शन म्हणजे काय -
अनेक प्रकरणांत तर व्हॉटस्अॅपवर अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल केला जातो आणि त्यांच्या जाळ्यात एखादी व्यक्ती अडकली की, आक्षेपार्ह स्थितीतील व्यक्तीचे व्हिडिओ तयार केले जातात. काहीवेळा तर युजरचा फोटो घेऊन मॉर्फ व्हिडिओ तयार केला जातो. त्यानंतर संबंधितांना ब्लॅकमेल केलं जातं. ऑनलाइन फसवणूक करणारे भामटे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतात. समोरील व्यक्तीकडून पैसे उकळल्यानंतर हा प्रकार थांबत नाही तर वाढतच जातो, यालाच सेक्सटॉर्शन असं संबोधलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Ratnagiri, Ratnagiri police