मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'सेक्सटॉर्शन' रॅकेटमुळे नवी मुंबईत खळबळ, 72 वर्षांचा नागरिक जाळ्यात अडकला

'सेक्सटॉर्शन' रॅकेटमुळे नवी मुंबईत खळबळ, 72 वर्षांचा नागरिक जाळ्यात अडकला

सेक्सटॉर्शन रॅकेटमुळे नवी मुंबईमध्ये खळबळ माजली आहे.

सेक्सटॉर्शन रॅकेटमुळे नवी मुंबईमध्ये खळबळ माजली आहे.

सेक्सटॉर्शन रॅकेटमुळे नवी मुंबईमध्ये खळबळ माजली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Navi Mumbai, India

नवी मुंबई, 2 नोव्हेंबर : सेक्सटॉर्शन रॅकेटमुळे नवी मुंबईमध्ये खळबळ माजली आहे. सीबीडी बेलापूरमधील 72 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकला आहे. आठवड्याभरापूर्वी या व्यक्तीला अज्ञात व्हिडिओ कॉल आला. या व्हिडिओ कॉलवरून महिलेकडून ज्येष्ठ नागरिकाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सायबर चोरट्यांनी हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला आणि ज्येष्ठ नागरिकाला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने 1 लाख 27 हजार रुपये दिले.

पैसे दिल्यानंतरही या ज्येष्ठ नागरिकाकडे सायबर चोरट्यांनी वारंवार अधिकच्या पैशांची मागणी केली, त्यामुळे नागरिकाने सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याआधी पुण्यामध्येही सेक्सटॉर्शनचे प्रकार समोर आले आहेत. पुण्यात ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. दरम्यान ती तरूणी सातत्याने खंडणीची मागणी करत असल्याने त्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या केलेला 25 वर्षीय तरुण हा धनकवडीत रहायला होता. त्याने 30 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

First published: