आग्रा, 6 मार्च : आग्रामधील (Agra News) हरीपर्वत पोलिसांनी शहरातील प्रमुख शूज उद्योगपतीच्या मुलाला शनिवारी अटक करून तुरुंगात पाठवलं. त्याच्यावर पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य, मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि खासगी संबंधांचे व्हिडीओ शूट केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने सांगितलं की, पतीने लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर पत्नीसोबत दुष्कृत्य केलं. त्याने अनेक वेळा तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. पीडितेने तक्रारीत दिलं आहे की, पतीने लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर तिला त्रास दिला. अनेकवेळा अनैसर्गिक संबंध ठेवले. यानंतर समोर आलं की, त्याचे लहानपणीच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध आहे. मात्र पत्नीने विरोध केल्यानंतर सासू-सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढलं. पीडिता हरीपर्वंत भागातील शूज उद्योगपतीची मुलगी आहे. तिचं लग्न 7 मे 2021 रोजी खंदारी भागातील शूज उद्योगपतीच्या मुलासोबत झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याने पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्यास जबरदस्ती केली. पत्नीने विरोध केला तर तो आक्रमक झाला. त्यामुळे तीदेखील विरोध करू शकली नाही. यानंतरही अनेकदा त्याने पत्नीसोबत असच कृत्य केलं. सुरुवातील तर पती असं का वागतोय हेच तिच्या लक्षात आलं नाही. यानंतर समोर आलं की, पतीचं लहानपणीच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅटमुळे हा खुलासा झाला. हे ही वाचा- अकोल्यात अभियंत्याकडून पत्नीचा लैंगिक छळ, घटस्फोटानंतरही सुरू होता विकृत प्रकार पीडितेने आरोप केला आहे की, पतीने तिच्यासोबत अनेकदा अनैसर्गिक संबंध ठेवले. 9 डिसेंबर 2021 रोजी पतीच्या वाढदिवसाची पार्टी होती. यात तो खूप दारू प्यायला. यानंतर त्याने तिच्यासोबत मारहाण केली. एकेदिवशी पतीने शरीरसंबंधादरम्यान तिचा व्हिडीओ शूट केला. जेव्हा तिला याबाबत कळालं तर तिने व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितलं. तो पुन्हा मारहाण करू लागला. 1 डिसेंबर 2021 रोजी विरोध केला म्हणून व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेने पतीविरोधात हुंड्यासाठी त्रास देणे आदी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी पतीला बीएमडब्ल्यू कारसह अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.