Home /News /crime /

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानं नवरा झाला मेल सेक्स वर्कर; बायकोनं केली धक्कादायक मागणी

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानं नवरा झाला मेल सेक्स वर्कर; बायकोनं केली धक्कादायक मागणी

तिच्या पोस्टनंतर महिलांच्याही भरपूर कमेंट यायला लागल्या. बर्‍याचशा महिलांनी आपलं दुःख या ठिकाणी शेअर केलं आणि नवरा घरकामात मदत करत नसल्याचं सांगितलं.

तिच्या पोस्टनंतर महिलांच्याही भरपूर कमेंट यायला लागल्या. बर्‍याचशा महिलांनी आपलं दुःख या ठिकाणी शेअर केलं आणि नवरा घरकामात मदत करत नसल्याचं सांगितलं.

लॉकडाऊनमुळे नोकरी (Jobless) गेलेला नवरा संशयास्पद वागत असल्याचं बायकोच्या लक्षात आलं. त्यानंतर तिनी तपास केल्यावर तिला कळालं, की तिचा नवरा पुरूष सेक्स वर्कर (Male Sex Worker) म्हणून काम करतो

नवी दिल्ली 13 एप्रिल: कोरोना महामारीचे जसे आरोग्यावर परिणाम झालेत तसेच ते मानसिक आरोग्यावरही झाले आहेत. लॉकडाऊनमुळे (Lockdown) या काळात जोडप्यांनाही सोबत बराच काळ घालवायला मिळाल्यानंतर काहींना खूप सुख मिळालं, तर काहींचे संसार मोडले आहेत. एरवी नोकरी-उद्योगात व्यस्त असताना स्वभावांत झालेले बदल लॉकडाऊनच्या काळात प्रकर्षाने जाणवले आणि घटस्फोट झाले अशीही अनेक उदाहरणं आहेत. नुकतंच बंगळुरूमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. लॉकडाऊनमुळे नोकरी (Jobless) गेलेला नवरा संशयास्पद वागत असल्याचं बायकोच्या लक्षात आलं. त्यानंतर तिनी तपास केल्यावर तिला कळालं, की तिचा नवरा मेल एस्कॉर्ट म्हणजे पुरूष सेक्स वर्कर (Male Sex Worker) म्हणून काम करतो आणि पैसे कमवतो. त्यानंतर या महिलेने त्याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली. माध्यमांतील बातम्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार 24 वर्षांची ही तरुणी आणि 27 वर्षांचा तरूण बीपीओमध्ये नोकरीला (BPO Job) होते. त्यांची 2017 मध्ये कंपनीच्या कॅन्टीनमध्ये भेट झाली आणि ते भेटू लागले. प्रेमात पडल्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यानंतर बंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात ते राहात होते. पण लॉकडाऊनमुळे या तरुणाची नोकरी गेली. त्यानंतर त्यानं नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला नोकरी मिळाली नाही. काही दिवसांनी पत्नीला शंका आली की नवरा बराचवेळ लॅपटॉपवर (Laptop)असतो आणि फोनवर बोलत असतो. त्यामुळे तिने चौकशी केल्यावर त्याने तिला काहीही सांगितलं नाही. पुढे भावाच्या मदतीने त्या पत्नीने नवऱ्याचा लॅपटॉप उघडून पाहिल्यावर तिच्या नवऱ्याचे अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आढळले. तरीही ते फोटो आपले नाहीत असाच तो दावा करत होता. पण, नंतर त्याने मान्य केलं की तो मेल एस्कॉर्ट म्हणून काम करतो. बंगळुरू शहरात त्याच्या अनेक क्लायंट असून त्यांच्याकडून तो एकावेळचे 3 ते 5 हजार रुपये कमवतो. हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांच्या वुमन्स हेल्पलाइनशी (Police Women Helpline) संपर्क साधला. तिथं दोघांचं कन्सल्टेशनही करण्यात आलं. नवऱ्यानी हे नवं काम आपल्याला आवडत असलं तरीही बायकोवर खूप प्रेम असल्याचं सांगितंल. तिला सोडायची इच्छा नाही असंही त्यानं सांगितलं. यापुढे तो मेल सेक्स वर्कर म्हणून काम करणार नाही, असंही मान्य केलं. पण पत्नीचा विश्वासघात झाल्याने तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तिने कोर्टात त्यासंबंधी अर्जही दाखल केला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Divorce, Sex racket, World After Corona

पुढील बातम्या