मुरैना, 13 ऑगस्ट : मध्य प्रदेशातील मुरैना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीला मार्गातून दूर करण्यासाठी एक फिल्मी प्लॅन केला आणि तब्बल 22 महिने संपूर्ण कुटुंबाशी खोटे बोलत राहिली. मात्र, तिच्या एका चुकीमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना सिंहौनिया भागाच्या पुरा गावाची आहे. गावात विश्वनाथ नावाचा तरुण त्याच्या वृद्ध आई आणि पत्नीसह राहत होता. त्याची बहीणही जवळच्या गावात राहत होती. यादरम्यान विश्वनाथच्या पत्नीचे त्याच्या शेतात काम करणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. विश्वनाथच्या आईला दिसत नव्हते. तसेच ऐकू येत नव्हते. याचा फायदा घेत महिलेने अनेकदा तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बोलावले. दोघांना वाटले की, विश्वनाथसोबत दोघे एकत्र राहू शकत नाहीत, तेव्हा त्यांनी त्याला मार्गातून हटवण्याची योजना आखली. 23 नोव्हेंबर 2020 रोजी या महिलेने आपल्या पतीला वस्तू खरेदीच्या बहाण्याने नेले. त्यानंतर त्याला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याला जिवंत कालव्यात फेकून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सासूने आपल्या मुलाबाबत विचारणा सुरू केली असता तिने आपला पती गुजरातला कामानिमित्त गेल्याचे सांगितले. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने सासरचे घर सोडले. त्यानंतर ती तिच्या प्रियकरासोबत मुरैना येथे राहू लागली. ती गावी गेल्यावर म्हातारी सासू तिच्या मुलाबद्दल विचारायची, मग ती तिच्या पती सांगून प्रियकराचे आपल्या सासूसोबत बोलणे करुन देत होती. विश्वनाथचे सिम तिच्या फोनमध्ये टाकून ती सासूशी बोलणे करुन द्यायची. हेही वाचा - ‘तुझ्या शिष्याला पकडलंय तू नाही तर…’ म्हणत दोघांकडून तृतीयपंथीयावर अत्याचार तर विश्वनाथच्या बहिणीने तिच्या वहिनीला आपल्या भावाचा नंबर मागितला. यानंतर बहिणीने फोन केल्यावर बोलायवला सुरुवात केली तर तिला हा आवाज आपल्या भावाचा नसल्याचा संशय आला. यानंतर विश्वनाथच्या बहिणीने पोलिसांत धाव घेतली. तसेच आपला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सायबर सेलच्या तपासात मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकावरून अरविंद आणि विश्वनाथ या दोघांचे सिम एकाच मोबाइलवरून चालवले जात असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. याप्रकरणी त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. तब्बल 22 महिने ती तिच्या प्रियकराचे तिच्या सासूसोबत बोलणे करुन देत राहिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.