मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'तुझ्या शिष्याला पकडलंय तू नाही तर...' म्हणत दोघांकडून तृतीयपंथीयावर अत्याचार

'तुझ्या शिष्याला पकडलंय तू नाही तर...' म्हणत दोघांकडून तृतीयपंथीयावर अत्याचार

 'तू नाही तर...' तृतीयपंथीयावर दोघांनी केला अत्याचार, जालन्यात विकृतीचा कळस गाठणारी धक्कादायक घटना

'तू नाही तर...' तृतीयपंथीयावर दोघांनी केला अत्याचार, जालन्यात विकृतीचा कळस गाठणारी धक्कादायक घटना

'तू नाही तर...' तृतीयपंथीयावर दोघांनी केला अत्याचार, जालन्यात विकृतीचा कळस गाठणारी धक्कादायक घटना

जालना : विकृतीचा कळस गाठणारी एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. स्त्रीवर नाही तर आता तृतीयपंथीयास्वर अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेमुळे जालना जिल्हा हादरला आहे. तृतीयपंथीयावर दोन जणांनी अत्याचार केला.

जालना जिल्ह्यातील मंठा बायपास उड्डाणपुलाखाली ही धक्कादायक घटना घडली आहे. आतापर्यंत स्त्रीयांवर किंवा पुरुषांवर अत्याचर केल्याच्या घटना समोर आल्या होता. आता तृतीयपंथीयावरही अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसिचा काढला काटा, एकत्र वेळ घालवला आणि....

तुझ्या शिष्याला पकडून ठेवलं आहे. तू आल्याशिवाय सोडणार नाही असं सांगून तृतीयपंथीला आपल्यासोबत दोन जण घेऊन गेले. मंठा उड्डाणपुलाखाली त्यांनी तृतीयपंथीला आणलं आणि अत्याचाराची परिसीमा गाठली.

जळगावात सैराट! अल्पवयीनं भावाकडून बहीण आणि तिच्या प्रियकराची हत्या

तृतीयपंथीयाला स्कूटीवर बसवून या दोघांनी उड्डाणपुलाखाली नेलं. तिथे दोघांनी बळजबरी केली. या प्रकरणी पीडित तृतीयपंथीयाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Crime news, Maharashtra News, Police action