मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दारुच्या व्यसनाला कंटाळले कुटूंब; पत्नी आणि मुलाचं भयानक कृत्य

दारुच्या व्यसनाला कंटाळले कुटूंब; पत्नी आणि मुलाचं भयानक कृत्य

पोलिसांनी चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Ramgarh, India

    रामगढ, 29 डिसेंबर : एखादा गुन्हा घडल्यावर आरोपी काही ना काही धागेदोरे मागे ठेवतोच. आरोपी सराईत असेल, तर पोलिसांना त्याला शोधण्यासाठी जास्त वेळ लागतो. नाहीतर पोलिसांच्या नजरेतून आरोपी फार काळ लांब राहू शकत नाही. झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात अशाच एका गुन्ह्याचा तपास पोलिसांनी लावला. विहिरीत पडलेल्या मृतदेहाबाबत तपास करताना पोलिसांनी गुन्ह्याची केलेली उकल पाहून गावकऱ्यांनाही धक्का बसला. ‘आज तक’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे.

    झारखंडमधील रामगढ जिल्ह्यात गावाबाहेरच्या एका विहिरीत काही दिवसांपासून पडलेला मृतदेह पोलिसांना मिळाला. जिल्ह्यातल्या कुजू ओपी भागातल्या दिग्वार गावातून 26 डिसेंबरला पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तिथे जाऊन चौकशी केली. विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. गावकऱ्यांच्या मदतीनं तो मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. मृतदेह पाहून त्या व्यक्तीचा मृत्यू किमान आठवडाभर आधी झालेला असावा याचा अंदाज पोलिसांना आला. तसंच ती आत्महत्या नसून, हत्या असल्याबाबतही पोलिसांना संशय आला.

    मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरु केली. मृतदेहाचं पोस्टमॉर्टेमही करण्यात आलं. त्यावरून मृत व्यक्तीचं नाव शिवनारायण कुशवाह असून, तो 55 वर्षांचा होता असं पोलिसांना कळालं. मृतदेह पाण्यावर येऊ नये यासाठी मृतदेहाला चादरीत गुंडाळून मोठमोठे दगड बांधून विहिरीत फेकून देण्यात आलं होतं. मात्र तसं झालं नाही. आणि मृतदेह पाण्यावर तरंगू लागला. त्यामुळे गावकऱ्यांना तो दिसला व त्यांनी पोलिसांना त्याबाबत कळवलं.

    हेही वाचा - आधी उशीने तोंड दाबलं अन् शाहबादने कुसूमच्या शरीराची केली चाळण; आणखी एक भयाण घटना

    शिवनारायण कुशवाह याच्याबद्दल पोलिसांनी तपास केल्यावर असं आढळलं, की त्याला दारूचं व्यसन होतं. त्याच्या दारूच्या सवयीला कुटुंबीय कंटाळले होते. तो रोज घरी बायकोला मारहाण करायचा. ही गोष्ट समोर आल्यावर पोलिसांनी बायको आणि मुलाचीही चौकशी केली. मुलगा गणेश कुशवाहा यानं वडील एक आठवड्यापासून बेपत्ता असल्याचं पोलिसांना चौकशीवेळी सांगितलं. त्यानं तीन दिवसांपूर्वी कुजू ओपी पोलीस ठाण्यात वडील हरवल्याची तक्रार दिल्याचंही तो म्हणाला. त्यानंतर पोलिसांनी शिवनारायण याच्या बायकोची चौकशी केली. त्यावेळी तिनं नीट उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांचा त्या दोघांवरचा संशय बळावला. थोडा पोलिसी खाक्या दाखवल्यावर लगेचच त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

    रोजरोज दारू पिण्याच्या सवयीमुळे शिवनारायणच्या बायको व मुलानं त्याची हत्या केली व मृतदेह गावाबाहेरच्या विहिरीत फेकून दिला. केलेल्या गोष्टीचा कोणाला पत्ता लागू नये, यासाठी मुलानं वडील हरवल्याची तक्रारही पोलिसांना दिली. मात्र पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी आरोपींकडून गुन्हा कबूल करून घेतला व त्यानंतर त्यांना अटक केली. घडलेल्या घटनेमुळे गावकरी मात्र आश्चर्यचकित झाले.

    First published:

    Tags: Crime news, Jharkhand, Murder news, Wife and husband