मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पतीच्या मित्रावरील प्रेमासाठी 3 मुलांच्या आईचं घृणास्पद कृत्य, शेतात मृतदेह आढळल्याने गूढ उघड

पतीच्या मित्रावरील प्रेमासाठी 3 मुलांच्या आईचं घृणास्पद कृत्य, शेतात मृतदेह आढळल्याने गूढ उघड

बल्लू हा गावातील सचिन पटेलच्या लग्न समारंभाला गेला होता. तोही रात्री उशिरा घरी परतला होता. पण, कोणीतरी त्यांना सांगितले की, कार्यक्रमात त्यांच्या नातेवाईकाचे भांडण झाले.

बल्लू हा गावातील सचिन पटेलच्या लग्न समारंभाला गेला होता. तोही रात्री उशिरा घरी परतला होता. पण, कोणीतरी त्यांना सांगितले की, कार्यक्रमात त्यांच्या नातेवाईकाचे भांडण झाले.

बल्लू हा गावातील सचिन पटेलच्या लग्न समारंभाला गेला होता. तोही रात्री उशिरा घरी परतला होता. पण, कोणीतरी त्यांना सांगितले की, कार्यक्रमात त्यांच्या नातेवाईकाचे भांडण झाले.

दमोह, 4 जुलै : मध्यप्रदेशच्या दमोहामध्ये पती-पत्नीच्या (Husband Wife Relation) नात्याला काळिमा फासल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दमोहा जिल्ह्यातील मिर्जापूर (Mirzapur damoh) गावातील एका पत्नीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची हत्या (Husband Murder by wife and her husband) केली आहे. पतीचा गळा कापत तिने दोघांनी बल्लूची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

संपूर्ण प्रकरण काय?

आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी प्रियकर मृताचा जवळचा मित्र होता. पती हरवल्याची तक्रार करण्यासाठी पत्नी पोलीस ठाण्यात गेल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. मात्र, पोलिसांनी मोबाईल कॉलिंग ट्रेस केल्यावर हत्येचे संपूर्ण रहस्य उलगडले. यानंतर महिला आणि तिच्या प्रियकराने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेवर गावकऱ्यांचा विश्वास बसत नाही आहे.

ही घटना 28 जूनला मिर्झापूर गावात घडली. 36 वर्षीय आरोपी पत्नीचे नाव सावित्री पटेल असे आहे. तिने पोलिसांत तक्रार केली होती की, तिचा पती बल्लू पटेल (37) रात्री लग्नात गेला होता. मात्र, घरी परत आला नाही. यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली असता, 29 जूनला सकाळच्या सुमारास बल्लू पटेल याचा मृतदेह शेतात आढळल्याने एकच खळबळ उडाली. धारधार शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली होती.

दुसरीकडे, घटनेनंतर मृताच्या भावाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, बल्लू हा गावातील सचिन पटेलच्या लग्न समारंभाला गेला होता. तोही रात्री उशिरा घरी परतला होता. पण, कोणीतरी त्यांना सांगितले की, कार्यक्रमात त्यांच्या नातेवाईकाचे भांडण झाले. त्याची यानंतर बल्लू पुन्हा लग्नघरी पोहोचला आणि सकाळपर्यंत परतला नाही. त्यांची पत्नी सावित्री सकाळी काही कामासाठी शेतात गेली असता त्याची हत्या उघडकीस आली. तिने तेथे मृतदेह पाहिला व घरातील सर्वांना माहिती दिली.

पोलीस तपासादरम्यान, पोलिसांनी मृताच्या पत्नीवर संशय आला. आरोपी महिला पोलिसांसमोर आपले म्हणणे बदलून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. यानंतर पोलिसांनी महिलेचे कॉल डिटेल्स काढले असता संपूर्ण घटना समोर आली. पोलिसांनी सांगितले की, सावित्री हल्ले रकवार (37) नावाच्या व्यक्तीशी सतत बोलत असे. ज्यादिवशी खून झाला, त्या दिवशी दोघेही बराच वेळ बोलत होते. पोलिसांनी चौकशी केली असता हल्ले हा बल्लू पटेलचा जवळचा मित्र असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांना प्रकरण समजायला लागले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता महिलेने गुन्हा कबूल केला.

हेही वाचा - थरारनाट्य! अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न, मग खंडणीची मागणी; पोलिसांच्या एन्ट्रीनंतर पुढे काय झालं?

महिलेने पोलिसांना सांगितले की, तिला तीन मुले आहेत. तिच्या पतीला दारुचे व्यसन होते. तसेच तो तिला दररोज मारहाण करायचा. यामुळे तिला आपला पतीचा मित्र हल्लेसोबत राहायचे होते. त्यांनी एक दिवस बल्लूची हत्या करण्याची योजना केली. 28 जून रोजी बल्लूचा कोणाशी तरी वाद झाला आणि तो लग्नाला गेला होता. हे पाहून पत्नीला संधी मिळाली. यानंतर तिने प्रियकराला सांगितले की, पतिचे भांडण झाले आहे आणि तो बाहेर गेला आहे. त्यामुळे या परिस्थितीत त्याचा फायदा घेता येईल. यानंतर हाल्लेने रात्री उशिरा बल्लूला फोन करून दारू पार्टीसाठी शेतात बोलावले. दारूच्या नशेत बल्लू झोपी गेला. झोपताच हल्ले याने धारदार शस्त्र बाहेर काढून त्याचा गळा चिरला.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Murder news, Women extramarital affair