मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लग्न, Extra Marital Affair आणि पैशांसाठी पतीच्या हत्येचा कट, मुंबईला हादरवणाऱ्या घटनेमागील सत्य

लग्न, Extra Marital Affair आणि पैशांसाठी पतीच्या हत्येचा कट, मुंबईला हादरवणाऱ्या घटनेमागील सत्य

पती पत्नी

पती पत्नी

विवाहबाह्य संबंधातून खून, पती किंवा पत्नीची हत्या, यासंबंधीच्या बातम्या तुम्ही याआधी वाचल्या असतील. मात्र, मुंबईतून एक हैराण करणाऱ्या घटनेचा खुलासा झाला आहे. प्रेम आणि विश्वासघाताच्या या घटनेने पोलिसांनाही हादरवले आहे. पतीच्या हत्येसाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने तब्बल 7 महिने कट रचला होती. याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Khushalkant Dusane

मुंबई, 8 डिसेंबर : विवाहबाह्य संबंधातून खून, पती किंवा पत्नीची हत्या, यासंबंधीच्या बातम्या तुम्ही याआधी वाचल्या असतील. मात्र, मुंबईतून एक हैराण करणाऱ्या घटनेचा खुलासा झाला आहे. प्रेम आणि विश्वासघाताच्या या घटनेने पोलिसांनाही हादरवले आहे. पतीच्या हत्येसाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने तब्बल 7 महिने कट रचला होती. याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे.

24 ऑगस्ट 2022, सांताक्रूज, मुंबई

कपड्यांचे व्यावसायिक कमलकांत शहा यांना अचानक पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार आली. सुरुवातीला घरच्यांनी ही किरकोळ समस्या समजून डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनीही स्वतःहून औषधे दिली आणि घरी जाऊन आराम करण्यास सांगितले. मात्र, आरामाची बाब तर दूरच, त्यांचा त्रास वाढतच गेला.

19 सप्टेंबर 2022

कमलकांत यांना घाईगडबडीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यानंतर त्यांचा हा त्रास कधीच कमी झाला नाही. अखेर तब्बल महिनाभरानंतर 19 सप्टेंबरला ४६ वर्षांच्या कमलकांत यांना अनेक अवयव निकामी झाल्याने प्राण गमवावे लागले.

कमलकांत यांच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती -

मृत्यूपूर्वी डॉक्टर त्यांच्या आजारपणाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मृत्यूनंतरही त्यांच्या मृत्यूची कारणे जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि योगायोगाने त्यांचा रक्ताचा अहवालाने सर्वांना धक्का दिला. कमलच्या रक्तात धातूचे प्रमाण खूप जास्त म्हणजे तेही सामान्यपेक्षा शंभरपट जास्त असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. त्यातही दोन धातूंचे प्रमाण इतके जास्त होते, जे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक तर आहेतच, पण जेव्हा ते धातू माणसाच्या शरीरात पोहोचतात, तेव्हा माणसाचा अतिशय करुण अंत होतो.

कमलकांत यांचा मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात -

कमलच्या रक्तात आर्सेनिकचे प्रमाण 400 पट अधिक होते, तर थॅलियमचे प्रमाण 365 पट अधिक होते. आता या दोन धातूंचा एवढा मोठा साठा संशयास्पद असल्याने अशा परिस्थितीत डॉक्टरांसोबतच कमलच्या नातेवाईकांनाही त्यांच्या मृत्यूची शंका येऊ लागली. या परिस्थितीत, नंतर पोलीस आल्यावर पोस्टमॉर्टम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याचदरम्यान, कुटुंबात आणखी एका मृत्यूबाबत संशय बळावू लागला. कमलची आई सरला देवी यांचाही 13 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अवयव निकामी झाल्यामुळे अशाच रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. त्यामुळे कमलच्या मृत्यूनंतरही या दोन मृत्यूंचाही एकमेकांशी काही संबंध आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला होता.

आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. पोलिसांनी कमलची पत्नी काजल आणि इतर कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आणि या तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. कमलची बहीण कविता यांनी पोलिसांना सांगितले की, कमल हॉस्पिटलमध्ये दाखल असताना तिची वहिणी म्हणजे कमलची पत्नी कमलचे पैसे आणि खात्याची माहिती गोळा करण्याचा सतत प्रयत्न करत असे. यानंतर जेव्हा कमलचा मृत्यू झाला तेव्हा तिने लगेच त्याच्या लाइफ इन्शुरन्सची चौकशी सुरू केली.

काजलच्या वागण्यात कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचे दु:ख किंवा खेद दिसला नाही. यानंतर तपासात आता पोलिसांनी डॉक्टरांचे मत घेतले. डॉक्टरांनी सांगितले की आर्सेनिक आणि थॅलियम हे खरं तर स्लो पॉयझन्स आहेत, ते अन्नात मिसळल्याने त्याच्या चवीमध्ये किंवा रंगात फरक पडत नाही. पण ते शरीराच्या अंतर्गत अवयवांना निकामी करण्याचे काम करतात. सगळे एकत्र राहायचे, जेवण करायचे, तर कमलच्या शरीरात एवढ्या मोठ्या प्रमाणात या गोष्टी कशा पोहोचल्या? असा प्रश्न यानंतर निर्माण झाला.

हेही वाचा - एकाच मुलीची दोघांशी ओळख, प्रेमाचा त्रिकोण अनं नागपुरात तरुणावर जीवघेणा हल्ला

पत्नीने दिली धक्कादायक माहिती - 

आता कमलची पत्नी काजलवरचा संशय अधिक गडद होत होता. पोलिसांना काजलचा सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड काढला आणि या सीडीआरमुळे पोलीसही चक्रावून गेले. कमलची पत्नी काजल हिचे हितेश जैन नावाच्या व्यक्तीशी दीर्घकाळ बोलणे होत असे. आता पोलिसांनी हितेशचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तसेच पोलिसांनी काजल कसून चौकशी केली. या चौकशीत काजलने कबुली दिली की, तिचे हितेशवर प्रेम होते आणि त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर ती तिच्या प्रियकरासोबत त्याच्या पैशावर सुखी जीवन जगू शकली, म्हणून तिने तिचा प्रियकर हितेशसोबत मिळून पती कमलकांतची हत्या केली होती. पोलीस चौकशीत काजलने पती कमलकांतच्या जेवणात आर्सेनिक आणि थॅलियम सप्लिमेंट मिसळल्याची कबुली दिली. याची कल्पना तिचा प्रियकर हितेश याने तिला दिल्याचे सांगितले.

बालपणीच्या मित्राच्याच पत्नीसोबत अफेअर -

कमल आणि हितेश दोघेही बालपणीचे मित्र होते. लग्नाच्या दहा वर्षांपूर्वी काजलची कमलकांतचा मित्र हितेश याच्याशी भेट झाली होती. पण लग्न झाल्यानंतर कमलकांत आणि काजलमध्ये दुरावा निर्माण झाला, दोघेही एकमेकांपासून दूर जाऊ लागले आणि हितेश काजलच्या जवळ येऊ लागला.

हेही वाचा - वर्धा : गर्लफ्रेंड तिच्या मित्रासोबत नाचली, प्रियकराने रागाच्या भरात तरुणाला चाकूने केले जखमी

मधल्या काळात काजलने तिच्या मुलांसह पतीचे घर सोडले होते. मात्र नंतर पतीच्या हत्येच्या कटाचा नियोजनाचा भाग म्हणून ती 15 जून रोजी सासरच्या घरी परतली आणि तिने पती आणि सासू-सासऱ्यांना शांतपणे आर्सेनिक आणि थॅलिअम हे विषारी पदार्थ देण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे सात महिन्यांच्या नियोजनानंतर अखेर विषारी पदार्थाने आपला परिणाम दाखवला आणि कमलकांत यांना जीव गमवावा लागला.

काजलला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती, मात्र, तिचा प्रियकर हितेशला त्याच्या अटकेची भीती वाटत होती आणि याच भीतीपोटी त्याने पोलिसांपासून पळून जाण्याचा आणखी एक कट रचला. त्याने स्वतःचे अपहरण झाल्याची खोटी कथा रचली आणि पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले तोपर्यंत त्याने सांगितले की, काही लोकांनी त्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करून शहापूर येथील नाशिक रोडवर फेकून दिले.

पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. मात्र, पोलिसांनी त्याची कडक चौकशी केली असता त्याने स्वतःच अंगावर या जखमा केल्याचे सांगितले. कमलकांत आणि त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पोलीस तपासात या धक्कादायक खुलाशाने पोलिसांनाही हादरवून टाकले आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Women extramarital affair