जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / वकिलाच्या ड्रेसमध्ये कोर्टात पोहोचत तिथेच पत्नीवर गोळीबार, राजधानीतील खळबळजनक घटनेचा VIDEO

वकिलाच्या ड्रेसमध्ये कोर्टात पोहोचत तिथेच पत्नीवर गोळीबार, राजधानीतील खळबळजनक घटनेचा VIDEO

वकिलाच्या ड्रेसमध्ये कोर्टात पोहोचत तिथेच पत्नीवर गोळीबार, राजधानीतील खळबळजनक घटनेचा VIDEO

शुक्रवारी सकाळी साकेत कोर्टात एक खळबळजनक घटना समोर आली. साकेत कोर्टात सकाळी एका महिलेवर गोळी झाडण्यात आली. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या खटल्यात महिलेला साक्ष देण्यासाठी न्यायालयात आणण्यात आलं होतं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 एप्रिल : राजधानी दिल्लीचं न्यायालयही आता सुरक्षित राहिलेलं नाही. शुक्रवारी सकाळी साकेत कोर्टात एक खळबळजनक घटना समोर आली. साकेत कोर्टात सकाळी एका महिलेवर गोळी झाडण्यात आली. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या खटल्यात महिलेला साक्ष देण्यासाठी न्यायालयात आणण्यात आलं होतं. एनएससी पोलीस स्टेशनच्या अध्यक्षांनी महिलेला त्यांच्या कारमधून रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

मिळालेल्या माहितीनुसार, लॉयर्स ब्लॉकजवळ वकिलाच्या ड्रेसमध्ये आलेल्या पतीने महिलेवर गोळी झाडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकेत कोर्ट परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडलं आहे. आरोपी वकिलांच्या वेशात कोर्टाच्या आवारात घुसल्याचंही सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत महिलेला एक गोळी लागली आहे. ती गंभीर जखमी झाली आहे.

जाहिरात

महिलेच्या पोटात गोळी लागल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यानंतर ती वेदनांमुळे रडताना आणि ओरडताना दिसत आहे. यादरम्यान वकील जखमी महिलेला रुग्णालयात नेताना दिसले. गोळीबाराच्या घटनेनंतर न्यायालय परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात एकूण 4 राऊंड गोळीबार करण्यात आला, त्यापैकी एक गोळी महिलेच्या पोटात लागली. या घटनेनंतर न्यायालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हल्लेखोर पिस्तूल घेऊन न्यायालयाच्या आवारात कसा पोहोचला, हा प्रश्न सुरक्षेचे दावे उघड करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात