मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने पळवली बाईक, एक तास वाट पाहून मालकाने नोंदवली तक्रार

टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने पळवली बाईक, एक तास वाट पाहून मालकाने नोंदवली तक्रार

बाईकच्या (racing bike) विक्रीचा तोंडी सौदा (Deal) ठरल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह (test drive) घेण्याच्या बहाण्याने तरुणाने बाईक पळवून (bike stolen) नेल्याचा प्रकार उघड झाला आहे.

बाईकच्या (racing bike) विक्रीचा तोंडी सौदा (Deal) ठरल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह (test drive) घेण्याच्या बहाण्याने तरुणाने बाईक पळवून (bike stolen) नेल्याचा प्रकार उघड झाला आहे.

बाईकच्या (racing bike) विक्रीचा तोंडी सौदा (Deal) ठरल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह (test drive) घेण्याच्या बहाण्याने तरुणाने बाईक पळवून (bike stolen) नेल्याचा प्रकार उघड झाला आहे.

चंदिगढ, 16 ऑगस्ट : बाईकच्या (racing bike) विक्रीचा तोंडी सौदा (Deal) ठरल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह (test drive) घेण्याच्या बहाण्याने तरुणाने बाईक पळवून (bike stolen) नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. मित्राच्या ओळखीने बाईक विकत घेण्यासाठी आलेला हा तरुण गल्लीतून टेस्ट ड्राईव्ह घेतो, असे सांगून बराच वेळ गायब झाला. एक तास होऊनही तो परत न आल्यामुळे गाडी मालकानं पोलिसांत धाव घेतली.

अशी घडली घटना

हरियाणाच्या रेवाडी परिसरात राहणाऱ्या कृष्ण यादव यांना त्यांची रेसर बाईक विकायची होती. त्यासाठी गल्लीतील सर्व ओळखीच्या लोकांना त्यांनी ही बाब सांगितली होती. त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या मोहित नावाच्या तरुणाकडे त्याचा बजरंग नावाचा मित्र आला होता. मूळच्या राजस्थानातील असलेल्या बजरंगनं बाईक घेण्याची इच्छा मोहितकडे व्यक्त केली. त्यानुसार मोहित कृष्ण यादव यांच्याकडे बजरंगला घेऊन दिला.

सौदा ठरला

कृष्ण यादव यांच्याकडून 92 हजार रुपयांना ही बाईक विकत घेण्याचा सौदा ठरला. त्यापैकी 70 हजार ऍडव्हान्समध्ये आणि उतलेले 22 हजार बाईकची कागदपत्रं नावावर झाल्यानंतर यादव यांना देण्याचं ठरलं. हा सौदा ठरल्यामुळे यादव खुश होते. जी बाईक आपण विकत घेणार आहोत, त्याची टेस्ट ड्राईव्ह घेण्याची इच्छा बजरंगनं व्यक्त केली. यादव यांनी त्याला बाईकची किल्ली दिली. त्यानंतर बाईक घेऊन गेलेला बजरंग बराच वेळ झाला तरी परतलाच नाही. कृष्ण यादव आणि मोहित दोघेही त्याची वाट पाहत उभे होते. काही वेळाने मोहितने त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता.

हे वाचा -ठाण्यातील तरुणीचं जोधपूरच्या तरुणाशी झालं लग्न; 8 दिवसांतच वधूनं दाखवला रंग

एक तास वाट पाहिल्यानंतर बजरंगने आपल्याला फसवलं असल्याची खात्री दोघांनाही पटली. त्यांनी तातडीने पोलीस ठाणं गाठत बाईक चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरु केला आहे. मात्र अद्याप गाडी घेऊन फरार झालेला बजरंग पोलिसांना सापडलेला नाही.

First published:
top videos

    Tags: Bike riding, Crime, Haryana, Theft