भरतपूर, 12 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध माहित झाल्यानंतर पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात घडली. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत माहिती झाल्यावर पतीने रागाच्या भरात पोलीस ठाण्याच्या हद्दीतच तिच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच तिच्यावर चाकूनेही वार केले. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी महिलेला झील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या व्यक्तीची पत्नी पूर्वी गावातील एका तरुणासोबत पळून गेल्याने तो आपल्या पत्नीवर रागावला होता. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना बयाना परिसरातील नांगला मेघसिंग गावातील आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. गावातील रहिवासी रामकिशोरने पत्नीवर अवैध शस्त्राने गोळ्या झाडल्या. नंतर त्याच्यावर चाकूने वार केले. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची गंभीर प्रकृती पाहून प्रथमोपचार करून तातडीने भरतपूरला रेफर करण्यात आले. हेही वाचा - मैत्री अन् विश्वासाला काळिमा, पत्नीचा प्रियकर निघाला मित्र, दोघांनी त्याला असं संपवलं पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने पत्नीवर गावातीलच कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. दीड महिन्यापूर्वी ती त्याच्यासोबत गावातून पळून गेली होती. त्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी तिला नागौर जिल्ह्यातून आणले होते. चौकशीदरम्यान महिलेने पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तिला पतीच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, पत्नीच्या प्रेमप्रकरणामुळे पती रागात होता. यानंतर पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रागाच्या भरात रामकिशोरने रविवारी रात्री अचानक तिच्यावर हल्ला केला. सध्या जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलीस आरोपी पतीची चौकशी करत आहेत. भरतपूरमध्ये लग्नानंतरच्या प्रेमसंबंधात अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.