मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Extra Marital Affair चा संशय, पत्नी आणि तिच्या प्रियकर सरपंचाला बेदम मारहाण

Extra Marital Affair चा संशय, पत्नी आणि तिच्या प्रियकर सरपंचाला बेदम मारहाण

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

महाराजगंज, 1 डिसेंबर : प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधातून गुन्हे घडण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलं आहे. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेचे गावच्या सरपंचासोबत प्रेमसंबंध होते. एका हॉटेलमध्ये सरपंचासोबत असताना या महिलेच्या पतीने तिला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर पतीने मित्रांसह पत्नी आणि तिच्या प्रियकर सरपंचाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

उत्तर प्रदेशात महाराजगंज इथल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमध्ये पतीने पत्नी आणि तिच्या सरपंच असलेल्या प्रियकराला प्रेमाचे चाळे करताना पकडलं. त्यानंतर पतीने मित्रांसोबत पत्नी आणि तिच्या प्रियकराची यथेच्छ धुलाई केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरपंचाला मारहाण सुरू असल्याचं पाहून घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. त्यानंतर पतीने दोघांना पकडून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक रवी रॉय यांनी माहिती दिली. ते म्हणाले, `सरपंचाने नोकरीचं आमिष दाखवून माझ्या पत्नीवर बलात्कार केला आहे, अशी तक्रार महिलेच्या पतीने दिली आहे; मात्र पत्नीने हा आरोप फेटाळून लावला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.`

`या व्यक्तींच्या नावाने रूम बुक झाली होती. ते तीन तास या ठिकाणी होते. आमचा व्यवसाय आहे. ठरवून दिलेल्या अटी, नियमांनुसार आम्ही व्यवसाय करतो. जो कोणी आमच्या अटी मान्य करून रूम मागेल त्याला आम्ही भाडेतत्त्वावर रूम देतो,` असं हॉटेलच्या संचालकाने सांगितलं.

या महिलेच्या पतीने सांगितलं, `माझ्याच घरात राहून तिनं माझ्याविरोधात खटला दाखल केला आहे. हे तिचं पहिलं प्रकरण नाही. ती दर दोन दिवसांनी या व्यक्तीसोबत गायब व्हायची आणि पाच ते सात तासांनी घरी परत यायची. आज मी माझ्या मित्रांना तिच्या मागावर पाठवलं होतं. हे दोघं एका हॉटेलमध्ये असल्याचं मला माझ्या मित्रांनी सांगितलं. मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि हॉटेलबाहेर अडीच तास प्रतीक्षा केली. रोज ती असे प्रकार करते. मी जेव्हा तिच्या जवळ जातो तेव्हा ती जीवे मारण्याची धमकी देते किंवा अडकवण्याचा दम देते.`

`माझ्या पतीने मला घरातून सोबत आणलं आहे. ते कायम मुंबई, दिल्लीत असतात. आज खटला संपवून टाकू असं त्यांनी मला सांगितलं. त्यादरम्यान मला हॉटेलजवळ सरपंच दिसले. त्या वेळी त्यांनी मला खटला कसा संपेल असं सरपंचांना विचारण्यास सांगितलं. मी सरपंचांकडे जाताच त्यांनी मला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली,` असं संबंधित महिलेने सांगितलं.

हेही वाचा - लग्नानंतर एका वर्षातच तरुणीचा भयानक शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्...

`हा माझ्याविरुद्ध कट रचला गेला आहे. या दोघांमध्ये खटला सुरू आहे. तिचा नवरा तिला बोलावून घेऊन आला होता. या व्यक्तींनी यापूर्वीही खोटे आरोप केले आहेत. ते फोन करून एकमेकांशी भांडू लागले. या महिलेच्या नवऱ्याने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. ही माझी प्रेयसी नाही. मी माझ्या गावात होतो; पण लोक म्हणतात की मी त्यांच्या घरी गेलो आहे, असे आरोप माझ्यावर केले गेले. या महिलेच्या पतीने केलेले सर्व आरोप निराधार आहेत.` सध्या या प्रेमप्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Uttar pradesh news, Women extramarital affair