मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Shocking! पैशांची वाट पाहत राहिलं रुग्णालय; डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू

Shocking! पैशांची वाट पाहत राहिलं रुग्णालय; डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू

बाळाच्या जन्मानंतर अवघ्या तीन तासात महिलेचा मृत्यू झाला

बाळाच्या जन्मानंतर अवघ्या तीन तासात महिलेचा मृत्यू झाला

बाळाच्या जन्मानंतर अवघ्या तीन तासात महिलेचा मृत्यू झाला

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 13 डिसेंबर : बिहारमधील (Bihar News) मुंगेर येथील जमालपुर प्रखंडमधील गावातील 26 वर्षीय रेशमी कुमारी हिचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी नॅशनल रुग्णालयात (Death) मृत्यू झाला. ही तरुणी गर्भवती होती. मृत्यूचं कारण गर्भकळा सुरू असताना शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. यामागे रुग्णालयाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Death of a pregnant woman due to negligence of a doctor )

मृत रेशमीचा भाऊ उत्तम कुमार याने सांगितलं की, जीवन ज्योती रुग्णालयातील डॉक्टर सुनंदाने रुग्णाला पाहिल्यानंतर ऑपरेशन करण्याचं सांगितलं होतं. यासाठी तिने 38,000 रुपये फी घेणार असल्याचं सांगितलं. याशिवाय औषधांचा खर्ज वेगळा असे. डॉक्टरने उत्तमला सांगितलं की, जर रुग्ण गंभीर झाला तर रक्ताचीदेखील सोय करीव लागेल. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, ऑपरेशन करून बाळ आणि त्याची आई दोघेही सुरक्षित राहतील. यामुळे उत्तमने बहिणीला त्या रुग्णालयात दाखल केले. मात्र जोपर्यंत पैसे भरणार नाही तोपर्यंत डॉक्टरांनी तरुणीला हातही लावला नाही. एका तासानंतर उत्तमने 25 हजार रुपये जमा केले आणि त्यानंतरचे पैसे लवकरच जमा करतो असं सांगितल्यानंतर त्यांनी बहिणीवर उपचार सुरू केल्याचं उत्तमने सांगितले.

शस्त्रक्रिया केल्यानंतर तरुणीने रात्री 9.30 वाजता मुलाला जन्म दिला. डॉक्टरांनी तरुणीच्या कुटुंबीयांना याबाबत सांगितलं. सर्वांना खूप आनंद झाला. मात्र साडे तीन तासानंतर म्हणजे रात्री 12.30 वाजता डॉक्टरांनी सांगितलं की, तरुणीची प्रकृती बिघडली आहे. तिला रक्ताची आवश्यकता आहे. तातडीने तिला एक युनिट रक्त चढवण्यात आलं. काही वेळानंतर आणखी एक युनिट रक्त मागवण्यात आलं. मात्र तरीही तिची प्रकृती सुधारत नव्हती. यानंतर डॉक्टरने तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात सांगितलं.

हे ही वाचा-PubG and Free Fire गेमसाठी लहान भावाचा घेतला जीव; हे वाचून पायाखालची जमीन सरकेल

कसं बसं करून तिला नॅशनल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे तरुणीची अवस्था पाहून तेथील डॉक्टरांनी सांगितलं की, हिचं हिमोग्लोबिन अवघे 2 टक्के आहे. मात्र आधीच्या रुग्णालयात जेव्हा रेशमीला दाखल केलं होतं, तेव्हा तिचं हिमोग्लोबिन 11 टक्के होतं. नॅशनल रुग्णालयात तब्बल 3 तास उपचार केल्यानंतर रेशमीला मृत घोषित केलं. यानंतर उत्तमने जीवन ज्योती रुग्णालयावर निष्काळजीपणे रुग्णावर उपचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Pregnant woman