जयपूर, 13 फेब्रुवारी : अद्यापही ग्रामीण भागांमध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यातही तंत्र-मंत्र, काळी जादू (Black Magic), चेटकीणच्या नावाखाली लोकांची आजही फसवणूक केली जाते. यात अनेकांना जीव गमवावा लागतो. काही दिवसांपूर्वी तंत्र-मंत्रामुळे त्रस्त मुलाने बापाचीच हत्या केली होती. ही घटना राजस्थानमधील (Rajasthan News) दौरा येथील मेहंदीपूर बालाजी येथील आहे. तर दुसरीकडे राजसमंदमध्ये 13 महिन्याच्या आजारी बाळाला तांत्रिकाकडे घेऊन गेले. यावेळी त्याच्या शरीरात केवळ 2 ग्रॅम रक्त शिल्लक होते. त्याची तब्येत अधिक बिघडली, यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने स्वत:च रक्त देऊन बाळाचा जीव वाचवला. यासारखी अनेक उदाहरणं राजस्थानमधून समोर आली आहेत. वैज्ञानिक जगातही राजस्थानमधील काही भागात अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. विविध कारणांमुळे लोकं तंत्र-मंत्राची मदत घेतात. यात लगेच श्रीमंत होणं, मुलगा व्हावा म्हणून वा सूड उगवण्यासाठीही लोक मांत्रिकाकडे जातात. हे ही वाचा- लग्नाच्या 15 दिवसातच नववधू दागिने घेऊन छू मंतर, समोर आलं धक्कादायक वास्तव तांत्रिकांनी आपल्या कृत्यांमध्ये अनेक निरागस मुलांचा जीव घेतला. गंभीर आजारापासून सुटका मिळवण्यासाठी गरम सळीने मुलांना चटका दिला. कोट्यवधी बनण्यासाठी 11 वर्षांच्या बाळाचा बळी दिला. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये दर वर्षी 200 हून अधिक अशी प्रकरणं येतात. तंत्र-मंत्रासाठी 50 हून अधिक लोकांना आपला जीव द्यावा लागतो. भीलवाड़ा, अलवर, चितोड़गढ़, करोली, बांसवाड़ा, डूंगरपुर ही ठिकाणं तांत्रिकांचा गड असल्याचं मानलं जातं. मांत्रिकांनी 30 मुलांचा मृतदेह उकरून काढलं… श्रीगंगानगरमधील एका स्मशानात एका लहान मुलीचा मृतदेह पुरला होता. कुटुंब दुसऱ्या दिवशी स्मशानालं आले तर मुलीचा मृतदेह तेथे नव्हता. तर शेजारी दारूच्या बाटल्या, लाल कापड, भांडी दिसली. या घटनेनंतर तपास सुरू केला. यावेळी असं आढळलं की, अशा प्रकारे 30 बाळांचा मृतदेह उकरून काढण्यात आला होता. हाती लागलेल्या पुराव्यानुसार हे कृत्य मांत्रिकाचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.