मुंबई, 1 मार्च : शिवसेना पदाधिकारी आणि मुंबई मनपा स्थायी समिती सभापती यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आणि कार्यालयांवर 25 फेब्रुवारीच्या सकाळी आयकर विभागाने धाडी (Income Tax raid) टाकल्या. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अगदी सिनेमात घडावा तसा सीन गेले 4 दिवस सुरु होता. कारण सलग 4 दिवस आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या संपत्तीवर धाड सुरुच ठेवली होती. शेवटी काल दुपारी आयकरचे अधिकारी मोठ्या मोठ्या पिशव्या आणि बॉक्स भरुन कागदपत्रे घेवून जाधव यांच्या घरातून आणि इतर कार्यालयांतून बाहेर पडले (Income tax department seized documents). या धाडीत आयकर विभागाच्या हाती असं काय लागलंय याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
...पुरावे मिळातच धाड
आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फक्त आयकर विभागाची धाड नव्हती तर एक प्रकारे आयकर विभागाने चौकशी देखील केली आहे. गेली कित्येक दिवस आयकर विभाग यशवंत जाधव यांच्यावर नजर ठेवून होती. तसंच त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून त्यांची बेनामी संपत्ती किती आहे या संबंधी पुरावे आयकर विभागाचे अधिकारी गोळा करत होते. हे पुरावे मिळताच आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या संपत्तीवर धाडी टाकल्या.
वाचा : खेळ आता सुरू झाला, लवकरच पत्रकार परिषद' संजय राऊत पुन्हा 'बॉम्ब' टाकणार!
यशवंत जाधव यांच्या डायरीत दडलंय काय?
यशवंत जाधव यांच्याशी संबंधीत एक दोन ठिकाणी नाही तर तब्बल 30 पेक्षा जास्त ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. ज्यात जवळपास 1 कोटी रुपये रोख आयकर विभागाला आढळल्याचे बोलले जात आहे. शिवाय बेनामी संपत्तीचे कागदपत्रे, काही महत्वपुर्ण कागदपत्रे, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल फोन, प्रिंटर, स्कॅनर, सरकारी दस्तावेज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैशांची आणि व्यवहारांची नोंदी केलेली डायरी आयकर विभागाला धाडीत सापडली आहे. या डायरीत नेमकं दडलय काय? असा प्रश्न सर्वांना पडला असेल.
वाचा : राष्ट्रवादीला ईडीचा आणखी एक दणका, राज्यमंत्र्याची 13 कोटींची संपत्ती जप्त
अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता
आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डायरीत कंत्राटदारांची नावे, काही कंपन्यांची नावे, काही व्यक्तींची नावे, अधिकाऱ्यांची नावे, काही राजकीय व्यक्तींची नावे लिहली आहेत. शिवाय काही अशा नोंदी आहेत ज्यांचा अर्थ आयकर विभाग शोधत आहे. भविष्यात या डायरीमुळे मुंबईत अनेकजण अडचणीत येवू शकतात असं देखील आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
वाचा : एकीकडे रुग्णालयातून डिस्चार्ज, तर दुसरीकडे मुलाला ईडीचे समन्स
सध्या सर्वच CBI, ED, NIA आणि IT या केंद्रीय तपास यंत्रणा दाऊदच्या हवाला रॅकेटची पाळमुळं उखडून काढताना दिसत आहेत. यातच एका हवाला ॲापरेटरची चौकशी करत असताना यशवंत जाधव यांच्या कुटूंबियांकडे आल्याचे चौकशीत आयकर विभागाला आढळले, त्याची शहानिशा करण्यासाठी आयकर विभागाने या मॅरेथॉन धाडी टाकल्या. ज्यात आयकर विभागाच्या हाती घबाड लागल्याचे बोलले जात आहे. शिवाय परदेशी आर्थिक व्यवहार झाल्याचे देखील आयकर विभागाला संशय आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांच्या प्रकरणात ED ची एन्ट्री कधीही होवू शकते. त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांच्यानंतर यशवंत जाधव हे असे शिवसेना नेते असतील ज्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Mumbai, Raid, Shiv sena