रत्नागिरी, 16 जानेवारी : मुंबईप्रमाणेच दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे लोण आता कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील भरणे नाका या ठिकाणी खेड पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत दुर्मिळ व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या परजिल्ह्यातील तीन जणांच्या मुस्क्या आवडल्या आहेत. या कारवाईमध्ये खेड पोलिसांनी तीन परजिल्ह्यातील व्यक्तींसह एका दुचाकीसह एक किलो वजनाचे साधारण किंमत एक कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. खेड पोलिसांची आजपर्यंतची सर्वात मोठी ही कारवाई आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शशी किरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे, वन विभागाचे अधिकारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमधये 3 पर जिल्ह्यातील व्यक्तींवर वन्यजीवन 1972 कलम [2/10), 38, 40(2), 44(1), 45(20) (1). 48, 49() 51] [2] अतंर्गत खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यापासून 2 दुचाकीही ताब्यात घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती खेड पोलिसांनी दिली. हेही वाचा - कौटुंबिक कलहाचा भयानक शेवट! बापाने पोटच्या मुलांच्या जेवणात कालवलं विष अन् स्वतःने..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.