मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shocking! नवजात बाळाला शेजारी झोपवताना आईकडून घडली मोठी चूक, लेकीचा मृत्यू

Shocking! नवजात बाळाला शेजारी झोपवताना आईकडून घडली मोठी चूक, लेकीचा मृत्यू

अर्थात आईला माहित देखील नव्हतं..मात्र आई जेव्हा जागी झाली तेव्हा लेकीचा मृत्यू झाला होता.

अर्थात आईला माहित देखील नव्हतं..मात्र आई जेव्हा जागी झाली तेव्हा लेकीचा मृत्यू झाला होता.

अर्थात आईला माहित देखील नव्हतं..मात्र आई जेव्हा जागी झाली तेव्हा लेकीचा मृत्यू झाला होता.

पश्चिम बंगाल, 20 सप्टेंबर : कोलकत्यामध्ये (Calcutta News) आईच्या शेजारी झोपलेल्या नवजात बाळाचा (Newborn Baby dies) मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 23 दिवसांची मुलगी आपल्या आईच्या शेजारीच झोपली होती. काही वेळाने आईने उठून पाहिलं तर बाळ हालचाल करीत नव्हतं. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता.

कलकत्त्यातील पूर्वेकडील प्रगती मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. येथील निवारी दिवाकर मंडल यांची पत्नी अपर्णा दास हिने 23 दिवासंपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. अपर्णा उंचुपोटा भागात आपल्या वडिलांच्या घरी होती. यावेळी हा अपघात घडला. ही घटना शनिवारी घडली. अपर्णा दुपारचं जेवण झाल्यानंतर बाळाच्या शेजारीच झोपली. (baby dies of suffocation under pillow) जेव्हा ती उठली तेव्हा तिचा आवाजच येत नव्हता आणि ती हालचालदेखील करीत नव्हती.

दोन उशा एकत्र घेऊन झोपली होती आई

बाळ बेडच्या खाली पडू नये यासाठी आईने एकावर एक उशा तिच्या शेजारी ठेवून झोपली होती. झोपेतून जाग आली तर तिने पाहिलं की, बाळाचं तोंड उशिच्या खाली दाबलं गेलं आहे. आईने तिच्या तोंडावरून उशी हटवली. मात्र बाळ काहीच हालचाल करीत नव्हतं. बाळाचा चेहरा उशीच्या खाली आला. ज्यामुळे तिचा श्वास गुदमरला (baby dies of suffocation) आणि जागीच मृत्यू झाला.(newborn baby dies of suffocation under pillow)

हे ही वाचा-तीन वर्षांच्या मुलामुळे लागला हत्येचा सुगावा; म्हणाला, बाबांनी आईला खूप मारलं!

कुटुंबात पसरली शोककळा

बाळाची अवस्था पाहून आई घाबरली. तिने कुटुंबीयांना बोलावलं. बाळाला तातडीने एसआरएस मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सतत रडून रडून आईची अवस्था वाईट झाली आहे. घरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी अनैसर्गित कारण सांगत मृत्यू केला दाखल

पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलीस ठाण्यात अनैसर्गिक कारणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनाबद्दल लोकांची चौकशी करीत आहे. पोलिसांच्या मते हा एक अपघात होता.

First published:
top videos

    Tags: Baby died, Kolkata, Mother, West bangal