मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रक्ताने माखलेली चादर, भाजप आमदारांची उपस्थिती, ऑनर किलिंगचा अँगल अन् CBI चौकशी; नादिया गँगरेप प्रकरणातील धक्कादायक बाबी

रक्ताने माखलेली चादर, भाजप आमदारांची उपस्थिती, ऑनर किलिंगचा अँगल अन् CBI चौकशी; नादिया गँगरेप प्रकरणातील धक्कादायक बाबी

पोलिसांनी तपासासाठी मुलीच्या रक्ताचे डाग असलेली चादर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांनी चादर देण्यास नकार दिला. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर शेवटी चादरीचा एक तुकडा पोलिसांना देण्यात आला.

पोलिसांनी तपासासाठी मुलीच्या रक्ताचे डाग असलेली चादर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांनी चादर देण्यास नकार दिला. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर शेवटी चादरीचा एक तुकडा पोलिसांना देण्यात आला.

पोलिसांनी तपासासाठी मुलीच्या रक्ताचे डाग असलेली चादर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांनी चादर देण्यास नकार दिला. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर शेवटी चादरीचा एक तुकडा पोलिसांना देण्यात आला.

कोलकाता 22 एप्रिल : पश्चिम बंगालमधील (West Bengal) नादिया (Nadia Gangrape Case) जिल्ह्यातील हंसखली येथे 4 एप्रिल 22 रोजी एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आला. यानंतर तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) एका ग्रामपंचायतीतील नेत्याच्या मुलावर आरोप केले आहेत. हे प्रकरण सध्या मोठा चर्चेचा मुद्दा ठरला असून पश्चिम बंगालमध्ये त्याला राजकीय अँगलदेखील मिळाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुलीच्या मृत्यूनंतर वादग्रस्त विधान केल्यानं त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय भाजपनं या प्रकरणाचं सत्य बाहेर येण्यासाठी आपली एक स्वतंत्र समिती तयार केली आहे. शिवाय, विरोधी पक्ष आणि सामाजिक संस्थांच्या मागणीनंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. नादिया गँगरेप केस (Nadia Gangrape Case) प्रकरणी पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या एफआयआरमध्ये रक्तस्रावाचा उल्लेख का करण्यात आलेला नाही? मुलीचं अफेअर असल्याचा संशय आल्यामुळं ऑनर किलिंग (Honor Killing) तर झालं नाही ना? मुलीच्या घरी उपस्थित असलेल्या भाजप आमदारांनी (BJP MLA) रक्तानं माखलेली चादर पोलिसांना का दिली नाही? पीडितेच्या आईनं डॉक्टरांकडून पोटदुखीसाठी औषधं घेतली होती का? असे कितीतरी प्रश्न या प्रकरणाच्या तपासादरम्यान उपस्थित होत आहेत. या प्रश्नांमध्ये कितपत तथ्य आहे? आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? याचा शोध घेण्यासाठी दैनिक भास्करनं एक स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

बलात्काराच्या आरोपीची सुटका करीत कोर्टाने तरुणीला सुनावणी शिक्षा, कारण वाचून हैराण व्हाल!

नदिया जिल्ह्यातील मतुआ (दलित) समाजातील अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) झालेल्या गँगरेप प्रकरणाचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न दैनिक भास्करच्या टीमनं केला. यासाठी त्यांनी संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस स्टेशनला (Police Station) भेट दिली. याच पोलीस स्टेशनमध्ये गँगरेप होऊन सहा दिवस उलटल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला होता. तोपर्यंत पीडितेचा मृत्यू होऊनही पाच दिवस उलटले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र, एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं, हे प्रकरण हायप्रोफाईल (High Profile Case) असल्यानं आणि वरिष्ठांच्या ऑर्डरमुळं आमचे हात बांधले असल्यानं आम्ही बोलू शकत नसल्याचं कबूल केलं.

आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर या प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीमध्ये मुख्य आरोपी (Accused) ब्रजो गवालीच्या स्टेटमेंटचाही समावेश आहे. शिवाय गँगरेपची तक्रार दाखल झाल्यानंतर तीन दिवसांच्या आतच तपास अहवाल तयार करण्यात आला होता. 14 वर्षीय पीडित दलित मुलीवर गँगरेप झाल्याच्या आठव्या-नवव्या दिवशीच पोलिसांनी आपली एक स्वतंत्र थेअरी तयार केली होती. मुलीचा मृत्यू ऑनर किलिंग असल्याचं सांगितलं जाणार होतं. मात्र, त्यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडं गेलं, असंही सूत्रानं सांगितलं आहे.

या प्रकरणी दैनिक भास्करच्या टीमनं पीडितेच्या कुटुंबियांचीदेखील (Victim Family) भेट घेतली. तेव्हा मुलीच्या काकांनी स्पष्टपणे सांगितलं की, आपला जीव सोडण्यापूर्वी मुलीनं आपल्यावर रेप झाल्याचं आईला सांगितलं होतं. त्यांनी उघडपणे आरोपीचं नावही घेतलं. रक्तस्रावामुळं (Bleeding) गळून गेलेल्या पीडित मुलीला सोडण्यासाठी आरोपीचे कुटुंबीय आले होते. मुलीला रुग्णालयात नेलं तर प्रकरण उघड होईल म्हणून आरोपीच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याची धमकी दिली होती. मुलीला घरी आणल्यानंतर सुमारे 12 तासानंतर तिचा मृत्यू झाला. नराधमांनी तिला रुग्णालयात जाऊ दिलं नाही शिवाय पोस्टमॉर्टम (Postmortem) न करता अंत्यसंस्कार करण्यासाठीही दबाव टाकला होता. गँगरेप, रक्तस्त्राव आणि आरोपीच्या धमक्यांमुळं मुलीचा जीव गेला, असं मुलीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.

मुलीच्या कुटुंबियांनी दिलेली माहिती आणि पोलिसांनी तयार केलेला तपास अहवाल यामध्ये फरक आहे. पोलिसांतील एका उच्चपदस्थ सूत्रानं दिलेल्या माहितीमध्ये नदिया गँगरेप प्रकरणाचा तयार झालेला तपास अहवाल तपशीलवार उघड झाला आहे. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनुसार, आरोपी ब्रजो गवालीनं आपल्या जबाबामध्ये रेप केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. '4 एप्रिल रोजी माझा वाढदिवस होता. मी आणि माझे चार मित्र सोबत असल्याची मी मुलीला कल्पना दिली होती. आम्ही गँगरेप केलेला नाही. आम्ही बळजबरीनं नव्हे तर मुलीच्या संमतीनं सेक्शुअल एन्जॉयमेंटचा (Sexual Enjoyment) अनुभव घेतला. सगळं आटोपल्यावर मी मुलीला तिच्या घराजवळील बस स्टँडपर्यंत सोडायला गेलो होतो. तिथून ती सायकलवर एकटीच घरी जाणार होती. तोपर्यंत तिची प्रकृती एकदम ठीक दिसत होती,' असा जबाब आरोपीनं पोलिसांकडे नोंदवला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याची पडताळणी करण्यासाठी मुलीच्या घराजवळील बस स्टँडच्या परिसरामध्ये चौकशी केली. तिथे त्यांनी एक मुलगा आणि मुलीची साक्ष नोंदवली. बस स्टँडजवळील मुलानं दिलेल्या माहितीनुसार, 'पीडित मुलगी सायकल घेऊन निघाली होती. अचानक तिनं सायकल थांबवली आणि एका चौथऱ्यावर बसली. मी चौकशी केली असता तिनं डोकं दुखत असल्याचं सांगितलं. आपल्याला घरी नेऊन सोडण्याची विनंती तिनं केली होती. पण, मी मुलगा आहे. रात्रीच्यावेळी तिच्यासोबत जाणं मला योग्य वाटलं नाही. त्याचवेळी एक ओळखीची मुलगी मला दिसली. त्या ओळखीच्या मुलीनं तिला सायकलवर बसवलं. त्यानंतर, मी व माझ्या मित्रानं दाखवलेल्या गाडीच्या उजेडात प्रवास करत पीडितेला घरी नेऊन सोडलं होतं.'

पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस पीडितेच्या घरी गेले होते. त्यावेळी तिथे भाजप आमदार आशीस बिश्वास (Ashis Biswas) आणि मुकुटमणी अधिकारी (Mukut Mani Adhikari) उपस्थित होते. पोलिसांनी तपासासाठी मुलीच्या रक्ताचे डाग असलेली चादर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांनी चादर देण्यास नकार दिला. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर शेवटी चादरीचा एक तुकडा पोलिसांना देण्यात आला. पोलीस सूत्रानं असंही स्पष्टपणे सांगितलं की, मुलीच्या मृत्यूनंतर पोलीस जेव्हा पुरावे (Evidence) गोळा करण्यासाठी पोहोचले तेव्हा सकाळीच तिथे भाजपच्या दोन आमदारांची उपस्थिती देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळं पोलिसांनी ऑनर किलिंगचा अँगलही विचारात घेतला आहे.

पोलिसांनी चादरीचा तुकडा आणि स्मशानातून मुलीच्या अस्थी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये (Forensic Lab) पाठवल्या होत्या. मात्र, त्याचे रिपोर्ट पोलिसांच्या हातात येण्यापूर्वीच प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेलं. आता सगळे पुरावे सीबीआयकडे आहेत. पोलीस सूत्रानं पुढे असंही सांगितलं की, मृत मुलीच्या आईनं मासिक पाळीदरम्यान पोटदुखीसाठी स्थानिक डॉक्टरांकडून तिच्यासाठी औषधही घेतलं होतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीचं विश्लेषण केलं असता, पोलीस तपासामध्ये मुलीच्या कुटुंबियांना अजिबात विचारात घेतलं गेलं नव्हत. सीबीआय या प्रकरणात आली नसती, तर मुलीच्या कुटुंबीयांचे जबाब विचारही घेतले गेले नसते. पोलीस तपासात गँगरेप झाल्याचं निदर्शनास आलं असलं तरी मृत्यूचं कारण गँगरेप असल्याचं नमूद करण्यात आलेलं नव्हतं. पोलिसांनी साक्षीदारांच्या साक्षी तर नोंदवल्या मात्र, पीडित मुलीला रक्तस्राव झाला होता किंवा तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, याबाबत एक अवाक्षरही रिपोर्टमध्ये घेतलेलं नव्हतं.

एकूणच नदिया गँगरेप प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस जास्त क्लिष्ट होत आहे. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलेलं आहे. आता सीबीआय सुरुवातीपासून तपास सुरू करणारी आहे. त्यांच्या तपासात काय निष्पन्न होतं, हे येणारा काळच सांगेल.

First published:

Tags: Gang Rape, West bengal