Bhilai Crime News: भिलाई, 1 मे : तालपुरी कॉलनीतील पारिजात ब्लॉकमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला भररस्त्यात मारहाण केल्याचा (Chhattisgarh News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने हे कृत्य केलं आहे. आरोपीचं म्हणणं आहे की, तरुणी छोटे-छोटे कपडे घालून फिरते. ज्यामुळे कॉलनीतील स्थिती बिघडत आहे. यावरुन आरोपीने तरुणीला शिव्या देत मारहाण केली. घटनेच्या तक्रारीवर भिलाई नगर पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, तालपुरी कॉलनीतील पारिजात ब्लॉकमध्ये राहणारी सरिता सोना (21) हिने आरोपी सरबजीत सिंग याच्याविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने गुरुवारी रात्री उशिरा आपला मित्र अभिषेकसह रिसाली ढाब्यात जेवण करून परतत होती. यादरम्यान सरबजीत सिंगने तिला मारहाण केली. हा गोंधळ पाहण्यासाठी अनेक लोक जमा झाले. पोलीस आता घटनेचा तपास करण्यासाठी बघ्याचे जबाब घेत आहेत.
हे ही वाचा-पत्नीने लग्नाच्या पहिल्या रात्री पतीला सँडलने धुतलं;वीज-पाण्याचं कनेक्शनही गुल
सरिजा जेव्हा स्कूटी उभी राहून त्यातून सामान बाहेर काढत होती, तेव्हा आरोपी सरबजीत सिंग तेथे पोहोचला. त्याने तरुणीला छोटे कपड्यांवरुन शिव्या सुरू केला. यानंतर आरोपीने तरुणीला मारहाण सुरू केला. यारम्यान तरुणीचे मित्र तिला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. यानंतर शुक्रवारी भिलाई नगर पोलीस ठाण्यात तरुणीने प्राथमिक तक्रार दाखल केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Crime news