पाटना, 30 एप्रिल : बिहारची (Bihar News) राजधानी पाटन्यातून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एक नवरी आपल्या (Marriage) सासरच्या बाहेर धरणे आंदोलन करीत आहे. तिला पती, सासू आणि सासरच्यांसोबत सासरच्या घरी राहायचं आहे. मात्र सासरच्या मंडळींनी तिच्याबाबत केलेल्या खुलाशानंतर लोक हैराण झाले आहेत.
ही घटना पाटन्यातील राजीव नगर येथील आहे. येथे एक सून आपल्या सासरी धरणे आंदोलन करीत आहे. तिचा आरोप आहे की, सासरची मंडळी तिला घरात घेत नाही. यावर सूनेचं म्हणणं आहे की, कोणत्याही परिस्थितीत तिला घरात जायचं आहे. या दोघांच्या वादात पोलीस फक्त बघ्याचं काम करीत असून या सर्व प्रकरणामुळे परिसरात गोंधळ उडाला आहे.
तीन वर्षांपूर्वी मारहाण, आता धरणे आंदोलन..
या सूनेचं नाव स्मिता आहे. तीन वर्षांपूर्वी पाटन्यातील राजीव नगर येथे राहणाऱ्या रोहितसोबत तिचं लग्न झालं होतं. लग्नाच्या वेळी दोन्ही पक्षाने आनंदाने आपल्या क्षमतेनुसार खर्च केला. मात्र लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री स्मिता आणि रोहितमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरुन वाद झाला. यानंतर स्मिता माहेरी निघून गेली. तेव्हापासून दोघे वेगळेच राहत आहेत.
हे ही वाचा-काही क्षणातच घेणार होती सात फेरे, पण त्याआधीच नवरीसोबत घडलं असं की; सर्वच झाले थक्क
हुंडा मागत होेते, म्हणून...
रोहितचे वडील विजय सिंह रेल्वेमध्ये अधिकारी पदावर होते. त्यांच्या आईने दावा केला आहे की, मधुचंद्राच्या रात्री स्मिताने रोहितला सँडलने मारहाण केली होती आणि माहेरी पळून गेली. यानंतर कधी रोहित तिला न्यायला गेला नाही आणि तीदेखील पुन्हा सासरी आली नाही. आता मात्र तिला सासरी यायचं आहे. तिला घरात घेत नसल्याने घराबाहेर धरणे आंदोलन करीत आहे. स्मिताने दावा केला आहे की, लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिचा हुंड्यासाठी छळ केला. म्हणून ती सासरहून निघून गेली.
विजय सिंह, चमेली देवी आणि रोहित यांचा आरोप आहे की, आता स्मिता त्यांना धरणे आंदोलनाच्या नावाखाली त्रास देत आहे आणि हुंड्यासाठी खोटे आरोप करत आहे. एवढेच नाही तर स्मिताने घरातील वीज आणि पाण्याचे कनेक्शनही तोडल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून पोलिस केवळ वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. तूर्तास कोणीही तोडगा काढण्यासाठी पुढे येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.