जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Washim News : मैत्रीच्या नात्याला कलंक! विश्वास ठेवला अन् घात झाला; तरुणीसोबत घडलं भयंकर

Washim News : मैत्रीच्या नात्याला कलंक! विश्वास ठेवला अन् घात झाला; तरुणीसोबत घडलं भयंकर

वाशिम क्राईम न्यूज

वाशिम क्राईम न्यूज

धक्कादायक! आधी भेटायला बोलवलं अन् बॉयफ्रेंडच्या मित्रांनीच मिळून केला अत्याचार

  • -MIN READ Washim,Washim,Maharashtra
  • Last Updated :

किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम : 22 वर्षांच्या तरुणीला बळजबरीने शेतशिवारात नेलं आणि तिच्यासोबत भयंकर कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी 16 ते 18 जूनपर्यंत तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वाशिम जिल्ह्यातील मानोरा  तालुक्यातील माहुली शेतशिवारात घडली. याप्रकरणी पिडित तरुणीच्या फिर्यादी नंतर तिघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मानोरा तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय तरुणीला सिमेंट दुकानात काम करणारा मिथुन जनार्थन राठोड याने 16 जूनला फोन करून पीडित तरुणीला भेटायला बोलावलं. त्यानंतर त्याने मित्रांनाही फोन केला. मित्र आणि नितीन दयाराम पवार त्या ठिकाणी आले खरे.

Pune News : दर्शनासोबत राजगडावर गेलेला राहुल बेपत्ता; मात्र फोन करून कुटुंबाला सांगितलं…

 मात्र मिथुन राठोडला दुकानावरून फोन आल्याने तो निघून गेला आणि तरुणीला घरी सोड असं सांगितलं. मित्राने मात्र तरुणीला घरी सोडून न देता एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर उत्तम चव्हाणला फोन केला आणि त्यानेही तिचा गैरफायदा घेतला. ही घटना 16 जून ते 18 जूनदरम्यान घडली. मुलगी घरी न आल्याने पीडित युवतीचे आई वडील मानोरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले. याची कुणकूण आरोपींना लागल्याने त्यांनी पीडितेस बाईकने मानोरा शहरातील एका मंदिर जवळ सोडले. पीडित तरुणीने मानोरा पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली. मिथुन राठोड यांच्यासह तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Solapur News : अल्पवयीन मुलीचा भररस्त्यात विनयभंग; CCTV मुळे समोर आलं नराधमाचं दुष्कृत्य

आरोपी नितीन पवार याला मानोरा पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपास कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे,पोलीस उपनिरीक्षक सविता वड्डे, पोलीस जमादार दीपक डोबाळे, गणेश जाधव, बालाजी महले,रवी राजगुरे करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात