वैभव सोनवणे/ पुणे, 19 जून : MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि वन विभागात रुजू झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला. नव्या करिअरची सुरुवात करण्यापूर्वीच तिच्या झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. दर्शना आपल्या मित्रासोबत 12 जून रोजी राजगडावर गेली होती. या दिवशी ती शेवटचं बाबांशी बोलली. त्यानंतर तिचा कोणाशीच संपर्क झाला नाही. तिचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी तक्रार केली होती, शेवटी 18 जून रोजी राजगडावर तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत तरुणीचे वडील दत्तू दिनकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना ही 9 जून रोजी पुणे येथे वनविभागाचे परीक्षेत (आर, एफ, ओ) विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झालेबद्दल सत्कार घेण्यासाठी आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी 10 तारखेपर्यंत 4 वाजेपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होती. मात्र त्यानंतर तिने आमचे फोन उचलले नाही म्हणून मी पुणे येथे चौकशी केली असता ती तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे याचे बरोबर सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेली असल्याचे कळाले.
दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर दोघांही गड चढायला सुरुवात केली. या प्रकरणाची चौकशी केली असता CCTV फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत आहे. मात्र नंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राहुल सध्या बेपत्ता आहे. राहुल नेमका कुठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाइलचं लोकेशन बाहेरील राज्यातील दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे आणि या प्रकरणात मी काहीही केलं नसल्याचं घरच्यांना सांगितलं आहे. Pune News : अपघात, घातपात की आणखी काही… राजगडच्या पायथ्याशी MPSC उत्तीर्ण तरुणीसोबत काय घडलं? राहुल हांडोरे हा मुळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाहवाडी गावाचा आहे. त्याने BSCचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तो पुण्यात MPSC ची तयारी करत होता. दर्शना आणि राहुलची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दोघेही एकमेकांच्या चांगल्या संपर्कात होते. 9 तारखेला हे दोघं ट्रेकिंगला राजगडावर गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी दोघांचे फोन बंद लागले. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांकडून 12 जूनला पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे .. दर्शना सोबत गेलेल्या राहूल हंडोरेचा तपास केल्यानंतर पोलिसांना ही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याच समोर आलंय.