मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /2 कोटींचे दागिने चोरून 5 स्टार हॉटेलात करीत होता आराम, अखेर...

2 कोटींचे दागिने चोरून 5 स्टार हॉटेलात करीत होता आराम, अखेर...

या चोराने 5 स्टार ट्रायडेंट हॉटेलमध्ये चोरी केली होती.

या चोराने 5 स्टार ट्रायडेंट हॉटेलमध्ये चोरी केली होती.

या चोराने 5 स्टार ट्रायडेंट हॉटेलमध्ये चोरी केली होती.

जयपुर, 2 डिसेंबर : जयपुरमधील (Jaipur) 5 स्टार हॉटेलच्या 'क्लार्क्स आमेर' (Clarks Amer) मधून 2 कोटी रुपयांचे दागिने चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पोलिसांनी चोराकडून दागिनेही जप्त केले आहेत. तो गुजरातमधील (Gujrat) सुरज येथील एका हॉटेलमध्ये आराम करीत होता, त्यावेळी 5 दिवसांपासून पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी त्याला अटक केली. (Was stealed jewelery worth Rs 2 crore and was relaxing in a 5 star hotel)

पकडलेल्या चोराचं नाव जयेश आहे. त्याने अत्यंत हुशारीने हॉटेलमधील दागिन्यांची चोरी केली. उदयपूरमधील एका हॉटेलमधूनदेखील त्याने 15 लाखांची चोरी केली होती. जयेश हा मूळत: गुजरातमधील जुनागढ येथील असून सध्या तो मुंबईत वास्तव्यास आहे. जयेश फाइव्ह स्टॉर हॉटेलमध्ये होणाऱ्या मोठ मोठ्या लग्नामध्ये हजेरी लावून तेथून चोरी करतो.

फिल्मी स्टाइलमध्ये केली चोरी..

जयेशने जयपूरमधील हॉटेल क्लार्क्स आमेरमध्ये फिल्मी स्टाइल चोरी केली होती. त्याने छत्तीसगडमधील व्यावसायिका राजीव बोथरा यांच्या मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांसह प्रवेश केला होता आणि 25 नोव्हेंबरच्या रात्री राहुल बांठियाच्या खोलीत चोरी केली. जयेश गुरुवारपासूनच राहुल बांठिया याच्या खोलीत नजर ठेवून होता. त्याने राहुलचा खोली क्रमांकदेखील पाहून ठेवला होता. राहुल सायंकाळी जेव्हा हॉटेलमधून निघाला तेव्हा चोराने रिसेप्शनवर फोन करून स्वत: राहुल असल्याचं सांगितलं आणि रूम खोलण्यास सांगितलं, याच्या काही वेळानंतर त्याने पासवर्ड विसल्याचं सांगून हॉटेल स्टाफला लॉकर देखील खोलण्यास सांगितलं. यानंतर त्याने 2 कोटी रुपयांचे दागिने आणि 95 हजार रुपये घेऊन फरार झाला.

हे ही वाचा-Shocking! मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता दीड वर्षांच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू

अन्य राज्यातील पोलिसही शोध घेत होती...

जयपूर हॉटेल क्लार्क्स आमेरमध्ये 26 नोव्हेंबर रोजी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराचा चेहरा दिसल्यानंतर इतर जिल्हा आणि राज्यातील पोलिसांना अलर्ट केलं. जयेशने जयपूरमध्ये घटनेच्या पूर्वी उदयपूरच्या फाइव्ह स्टार ट्रायडेंट हॉटेलमध्ये चोरी केली होती. अनेक राज्यांची पोलीस जयेशचा शोध घेत होती.

First published:

Tags: Crime news, Jaipur