पाटणा 19 एप्रिल : देशात एकीकडे कोरोनाबाधितांची (Coronavirus) वाढती संख्या आणि आरोग्य सुविधांची कमी यामुळे चिंतेत भर पडली आहे. तर, दुसरीकडे या संकटाच्या काळातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मात्र घट झालेली नाही. आता अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वॉर्ड बॉयवर ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न (Ward Boy Attempt to Rape on Corona Positive Woman) केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित वॉर्ड बॉयला अटक केली आहे.
ही घटना आहे मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधील. ग्वालियरमधील एका खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला याठिकाणी दाखल करण्यात आलं. महिलेची ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानं तिला ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मुलानं पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री विवेक लोधी नावाचा एक वॉर्ड बॉय त्याच्या आईच्या वॉर्डमध्ये आला. त्याची आई कोरोनाबाधित असल्यानं खोलीमध्ये इतर कोणीही थांबत नाही. याचाच फायदा घेत वॉर्ड बॉयनं महिलेसोबत चुकीचं कृत्य करण्यास सुरुवात केली.
व्हॉट्सअॅपवर चॅटिंग पाहिले, अन् बापाने दोन्ही मुलींना ट्रकखाली चिरडले, स्वत:ही
महिलेनं ओरडण्यास सुरुवात केल्यानंतर तो ताबडतोब खोलीतून फरार झाला. यानंतर महिलेनं आपल्या मुलाला फोन करुन या संपूर्ण घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महिलेचा मुलगा आपल्या कुटुंबीयांना घेऊन रुग्णालयात पोहोचला. पोलिसांनी सांगितलं, की मुलाच्या तक्रारीनंतर आरोपी विवेक लोधीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय वॉर्ड बॉयला अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी रुग्णालयावरही हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आले असून पोलीस याचा तपास करत आहेत. सोबतच वॉर्ड बॉयचीही चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus, Crime news, Rape news, Ward boy