Home /News /crime /

बायकोच्या अनैतिक संबंधाचा संशय, नवऱ्याने जिम ट्रेनरवरच केला ACID हल्ला

बायकोच्या अनैतिक संबंधाचा संशय, नवऱ्याने जिम ट्रेनरवरच केला ACID हल्ला

याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

विरार, 19 फेब्रुवारी : पत्नी जात असलेल्या जिममधील ट्रेनरवर पतीने अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या अ‍ॅसिड हल्ल्यात जिमचा ट्रेनर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतल्या के.एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रितेश कदम असं जखमीचे नाव असून हरीशचंद्र चौधरी असं आरोपी पतीचं नाव आहे. विरार पूर्वेकडील आरजे नगर येथे असलेल्या 'स्वेट बॉक्स' या जिममध्ये याच परिसरातून एक महिला व्यायाम करण्यासाठी जात होती. या महिलेचे जिमचा चालक व ट्रेनर रितेश याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या पतीच्या डोक्याला आला. यावरून दोघांमध्ये वादही झाला. यानंतर सदर महिलेच्या पतीने टोकाचे पाऊल उचलत जिम ट्रेनरवर थेट अ‍ॅसिडने हल्ला केला. हेही वाचा - इन्स्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार; बचावासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर! रात्रीच्या सुमारास ट्रेनर घरी परतत असताना महिलेच्या पतीने अंधार असलेल्या रस्त्यावर हा हल्ला करून पळ काढला. या घटनेत रितेश कदम हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र याबाबत विरार पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, या विचित्र घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Virar, Virar crime

पुढील बातम्या