मुंबई, 13 मार्च : पालघर जिल्ह्यातील विरार येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एक अल्पवयीन मुलगी रात्री एक वाजण्याच्या सुमारास औषधे घेण्यासाठी जात असताना दोन आरोपींनी तिचं अपहरण केलं. अपहरणानंतर मुलीला पालघर जिल्ह्यातील विरार येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर वांद्रे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
Mumbai | A minor girl was allegedly gang-raped on March 2 around 1 am while she was going to get medicines. The 2 accused kidnapped her, took her to Virar, Palghar district & raped her. Bandra police have arrested the 2 accused: Mumbai Police
— ANI (@ANI) March 13, 2023
धक्कादायक म्हणजे आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. 11 मार्च रोजी दोघांविरुद्ध भादंवि कलम 376(2)(एन), 366(ए), 328, 506,323,34 आणि पोक्सो कलम 4,8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.