छतरपूर, 16 मार्च : मध्य प्रदेशातील छतरपूर येथे असलेल्या बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. “पर्ची"मधून समस्या सांगण्याचा दावा असो किंवा भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची मागणी असो, ते ज्या कोणत्या मुद्द्यावर बोलतात, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री हे लहान वयातच देशात तसेच परदेशात प्रसिद्ध झाले आहेत. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर छतरपूर तसेच देशाच्या विविध भागात दिव्य दरबार भरवतात. “पर्ची"च्या माध्यमातून लोकांच्या समस्या सांगण्याचा त्यांचा दावा आहे. यानंतर ते समस्येचे निदान देखील स्पष्ट करतात. यातच त्यांच्या दैवी दरबाराशी संबंधित एक रंजक घटना समोर आली आहे. एका विवाहित व्यक्तीने बागेश्वर धामच्या पीठाधीश्वराच्या दैवी दरबारात पोहोचून आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी आशीर्वाद मागितला. तर यावेळी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी हे प्रकरण अनोख्या पद्धतीने हाताळले. दैवी दरबारात आलेल्या व्यक्तीने आपले नाव धर्मेंद्र असल्याचे सांगितले. मूळचा राजस्थानचा रहिवासी असलेला धर्मेंद्र सध्या भोपाळच्या नेहरू नगरमध्ये राहतो. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी धर्मेंद्र याला त्याच्या समस्या विचारल्या. तर धर्मेंद्रने सांगितले की, त्याच्या मर्जीविरुद्ध त्याचे लग्न लावण्यात आले. त्याने सांगितले की, घरातील सदस्यांना त्याला आवडत असलेली मुलगी आवडली नव्हती. यावर बागेश्वर धामच्या पीठाधीश्वरांनी काय हवे आहे, असे विचारले. यावर धर्मेंद्र म्हणाले की, त्याला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करायचे आहे. यावर बागेश्वर महाराज म्हणाले की, तो प्रेमाचा बळी आहे. कुटुंबीय भेदभाव करतात, असेही धर्मेंद्रने सांगितले. ‘मी रोज मरण्याचा विचार करतो’ धर्मेंद्रने पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना दैवी दरबारात सांगितले की, जिच्याशी त्याचे लग्न झाले आहे ती त्याला अजिबात आवडत नाही. कुटुंबीयांनीही त्याला व्यवसायातून काढून टाकल्याचा आरोप त्याने केला. यावर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर म्हणाले की, ही व्यक्ती प्रेमात आंधळी झाली आहे. जर प्रेयसी भेटली नाही तर काय करणार, असा प्रश्न धीरेंद्र शास्त्री यांनी केला. यावर धर्मेंद्र म्हणाला की, तो रोज मरण्याचा विचार करतो. त्याने सांगितले की तो दारू सोडेल, परंतु आपल्या प्रेयसीला सोडू शकत नाही. ऑर्केस्ट्रा पाहून परतणाऱ्या तरुणासोबत केले ‘भयानक कृत्य’, वाचून बसेल धक्का प्रेयसीसोबत आला दिव्य दरबारात - बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी धर्मेंद्रला त्याच्या प्रेयसीचे नाव विचारले. मूळचा उदयपूर (राजस्थान) येथील धर्मेंद्रने सांगितले की, त्याच्या प्रेयसीचे नाव ज्योती आहे आणि ती त्याच्यासोबत दरबारात आली आहे. यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, हा तर फारच वरच्या लेव्हलचा आहे. धर्मेंद्रचे म्हणणे ऐकून धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांची “पर्ची” काढली. यानंतर त्यांनी म्हटले की, तुझी बुद्धी खराब झाली आहे आणि तुला पुन्हा लग्न करायचे आहे. तसेच ज्योतीसोबतही योग जुळून येईल. त्याने दगडाचा व्यवसाय केला तर चांगले होईल. मी अजून एकदाही लग्न केले नाही आणि तो दोन-दोन लग्न करत आहेत, असेही यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.