जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी, सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीने केली आत्महत्या

रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी, सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीने केली आत्महत्या

नागपुरातील एका बलात्कार पीडित तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून स्वत: चा गर्भपात केला आहे. (File Photo)

नागपुरातील एका बलात्कार पीडित तरुणीने युट्यूब व्हिडीओ पाहून स्वत: चा गर्भपात केला आहे. (File Photo)

19 वर्षाच्या या तरुणीनं आधल्या दिवशी रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी केली होती. तरुणीनं आरोप केला की, तिच्या मित्रांनी तिच्यावर गँगरेप केला आहे. हा आरोप करत तिनं थेट आत्महत्येचं पाऊल उचललं.

  • -MIN READ
  • Last Updated :

बडोदा, 11 जून : गुजरातच्या वडोदरामध्ये एका तरुणीनं आत्महत्या (Vadodara Girl Suicide) केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीनं मित्राला फोन केला आणि तिचा बलात्कार झाला (Girl Gangrape Agitation) असल्याचं सांगितलं. 19 वर्षाच्या या तरुणीनं आधल्या दिवशी रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी केली होती. तरुणीनं आरोप केला की, तिच्या मित्रांनी तिच्यावर गँगरेप केला आहे. हा आरोप करत तिनं थेट आत्महत्येचं पाऊल उचललं. (वाचा- कोरोना काळात 28 टक्क्यांनी वाढले Online Fraud, देशाचं 25 हजार कोटींचं नुकसान ) बडोद्यामधी लक्ष्मीपुरा भागात राहणाऱ्या 19 वर्षीय मुलीनं शुक्रवारी सकाळी आत्महत्या केल्याचं पाहायला मिळालं. या तरुणीची तीन तरुणांबरोबर मैत्री होती. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीनं आधीच्या रात्री एका खोलीत तीन मित्रांबरोबर दारु प्यायली होती. त्यानंतर तरुणीनं तिच्या मित्रांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. (वाचा- सहकारी महिला डॉक्टरचा केला छळ; कोल्हापूरात वरिष्ठ डॉक्टरला नातेवाईकांनी चोपलं ) तरुणीनं सकाळी तिच्या मित्राला फोन केला आणि संपूर्ण घटनेबाबत सांगितलं, तसंच तिनं या आत्महत्या करण्यापूर्वी या सर्वाचा व्हिडिओदेखिल तयार केला. त्यानंतर या तरुणीनं आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी एका खासगी कंपनीमध्ये काम करत होती. तिच्या आईचं 6 महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. घराच्या एका रूममध्ये तिनं दोन तरुण आणि एका तरुणीबरोबर दारुची पार्टी केली. पार्टीमध्ये जास्त दारु प्यायल्यानंतर या तरुणीला प्रचंड नशा झाली होती. नशेमध्ये बुडालेल्या अवस्थेत तिचा गैरफायदा घेत दिशांत नावाच्या तरुणानं तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपात दोघांना अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात