जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'झोमॅटो डिलिव्हरी बॉयने नाक फोडलं' रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचा आरोप Viral Video

'झोमॅटो डिलिव्हरी बॉयने नाक फोडलं' रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचा आरोप Viral Video

'झोमॅटो डिलिव्हरी बॉयने नाक फोडलं' रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचा आरोप Viral Video

ऑर्डर उशीरा आल्याच्या वादातून झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने (Zomato delivery boy) आपल्याला मारहाण केली असा दावा बंगळुरुतील महिलेनं केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरु, 11 मार्च : ऑर्डर उशीरा (order delay) आल्याच्या वादातून झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने (Zomato delivery boy) आपल्याला मारहाण केली असा दावा बंगळुरुतील महिलेनं केला आहे. या महिलेने रक्तबंबाळ अवस्थेतील स्वत:चा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. त्यानंतर पीडित महिलेनं बंगळुरुतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? हितेशा चंद्राणी (Hitesha Chandranee) असं या प्रकरणातील मारहाण झालेल्या पीडित महिलेचे नाव असून त्या ‘कंटेट क्रिएटर’ आहेत. त्यांनी व्हिडीओ पोस्ट करुन आपली तक्रार मांडली आहे. ‘आपण दुपारी 3.30 च्या सुमारास झोमॅटो कंपनीकडे ऑर्डर बुक केली. सुमारे एक तास उलटल्यानंतरही कंपनीने ती ऑर्डर स्विकारली नव्हती. त्यामुळे मी या याबाबत कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस (customer service) विभागाशी फोनवर बोलत होते. आपली ऑर्डर रद्द करुन सर्व पैसे परत देण्याची मागणी मी त्यांच्याकडे फोनवर केली होती. त्याचवेळी डिलिव्हरी बॉय घरामध्ये आला आणि त्याने आपल्याला मारहाण केली, ’ असा दावा हितेशाने केला आहे. हितेशाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या नाकातून रक्क वाहताना दिसत आहे. ‘डिलिव्हरी बॉयने केलेल्या मारहाणीमुळेच आपल्यावर ही अवस्था ओढवली. त्याने आपल्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून घराबाहेर पळ काढला.’ असा दावा हितेशाने केला आहे. So guys this just happened to me yesterday Pls support me @zomato @zomatoin @viralbhayani77 @sagarmaheshwari @ATSBB @bbcnewsindia @narendramodi @cnnbrk @AltNews @NBCNews @itvnews @DgpKarnataka @TV9Telangana pic.twitter.com/TBso6N23k3 — Hitesha Chandranee (@HChandranee) March 10, 2021 ( वाचा :  19 वर्षीय मुलाने आईलाच संपवलं, 26 वर्षीय गर्लफ्रेंडच्या मदतीने काढला काटा  ) झोमॅटोने मागितली माफी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होताच झोमॅटो कंपनीने निवेदन प्रसिद्ध करत संबंधित डिलिव्हरी बॉयला कामावरुन हटवल्याची माहिती दिली आहे. तसंच कंपनीने या प्रकरणात हितेशा यांना सहकार्याचे आश्वासन देखील दिले आहे. हितेशा यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला अटक केली असून ते आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात