मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'माझा Sex slave म्हणून केला वापर'; भाजप आमदाराच्या सुनेचा धक्कादायक आरोप

'माझा Sex slave म्हणून केला वापर'; भाजप आमदाराच्या सुनेचा धक्कादायक आरोप

धक्कादायक म्हणजे त्यांचं सरकारी आमदार निवास हे ड्रग्स आणि दारूचा अड्डा असल्याचाही आरोप नीतूने केला आहे.

धक्कादायक म्हणजे त्यांचं सरकारी आमदार निवास हे ड्रग्स आणि दारूचा अड्डा असल्याचाही आरोप नीतूने केला आहे.

धक्कादायक म्हणजे त्यांचं सरकारी आमदार निवास हे ड्रग्स आणि दारूचा अड्डा असल्याचाही आरोप नीतूने केला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 4 फेब्रुवारी: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका भाजप नेत्याच्या (BJP MLA) सुनेने धक्कादायक आरोप केले आहे. तिने केलेल्या आरोपानुसार, तिचा सेक्स स्लेव्ह म्हणून वापर करण्यात आला. लग्नाच्या सहा महिन्यात मी जिवंत मृतदेहाप्रमाणे जगत असल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. (Used her as sex slave; Shocking allegation by BJP MLAs daughter in law)

मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमधून भाजप आमदार जालम सिंह पटेल यांच्या मुलाची पत्नी नीतू सिंग हिने हे धक्कादायक आरोप केले आहेत. आता मी दिल्लीत राहून नोकरी करते आणि न्यायालयात घटस्फोटासाठी लढत असल्याचं तिने सांगितलं. 2016 मध्ये तिला भाजप आमदार जालम सिंह पटेल यांच्या मुलासाठी विचारणा झाली होती. तेव्हा नीतूचं 26 वर्षे होतं.

नीतूचे धक्कादायक आरोप... Neetu's shocking allegations

लग्न ठरेपर्यंत कोणालाच सांगू नये अशी जबरदस्ती तिच्यावर करण्यात आली होती. राजकारणात हे करावं लागतं असंच तिला वारंवार सांगितलं जात होतं. सुरुवातील मुलावर कोणतेच कायदेशीर गुन्हे दाखल नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र लग्नानंतर कळालं की, हत्या, हत्येचा प्रयत्न याअंतर्गत त्याच्यावर 45 गुन्हे दाखल आहेत. शिक्षणाबद्दलही त्यांनी खोटचं सांगितलं. सामाजिक कार्यात असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं, मात्र लग्नानंतर कळालं की, हे सर्व खोटं आहे. लग्नाच्या आधी त्यांनी शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली होती. नकार दिल्यामुळे तो राग कायम त्यांच्या मनात होता.

हे ही वाचा-पतीचं अफेअर शोधण्यासाठी पत्नी बनली 'जेम्स बाँड'; GPS ट्रॅकर वापरून फोडलंं बिंग

लग्नानंतर माझा मोबाइल नंबर बदलला. माझं घरातून बाहेर जाणं बंद केलं. याशिवाय मी फोनवर कोणाशी बोलते हे देखील तपासलं जात होतं. आणि मला अनेक प्रश्न विचारले जात होते. याशिवाय आमदाराच्या मुलाचे बाहेर अनैतिक संबंध होते. मुलगा दररोज बाहेर गर्लफ्रेंडसोबत फिरत असे आणि घरी येऊन पत्नीवर जबरदस्ती करीत होता. याशिवाय पत्नीवर नियमित मारहाण करणे, तिला स्वातंत्र्य न देणे, तिच्याकडे सतत लक्ष ठेवणे, कधी कधी तर त्याने गळा दाबल्याचंही नीतूने सांगितलं. या दिवसात नीतूची प्रकृती ढासळही होती. याबाबत तिने माहेरच्यांनाही अनेकदा सांगितलं. मात्र त्यांनीही काही दिवसात हे सर्व ठीक होईल असंच सांगत राहिले. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

याबाबत तिने आमदार सासऱ्यालाही अनेकदा सांगितलं. मात्र ते या प्रकरणात सर्व ठीक होईल, इतकच सांगत होते. धक्कादायक म्हणजे त्यांचं सरकारी आमदार निवास हे ड्रग्स आणि दारूचा अड्डा असल्याचाही आरोप नीतूने केला आहे. यासंदर्भात तिच्याकडे पुरावे असल्याचं तिचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Bhopal News, BJP, Madhya pradesh, Mla, Serious allegation, Sexual assault, Sexual harassment