जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / धक्कादायक! पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी इमोजीचा वापर, 'असे' तयार केले जातात कोडवर्ड

धक्कादायक! पुण्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी इमोजीचा वापर, 'असे' तयार केले जातात कोडवर्ड

ड्रग्सच्या तस्करीसाठी इमोजीचा वापर

ड्रग्सच्या तस्करीसाठी इमोजीचा वापर

पुणे शहर पोलिसांनी मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत.

  • -MIN READ Pune,Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 27 मे : पुणे शहर पोलिसांनी मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत.  शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर अमली पदार्थांचं हॉटस्पॉट ठरत आहे . या प्रकरणात पोलिसांना आता नवीन माहिती मिळाली आहे. समोर आलेल्या माहितीनंतर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. इमोजीचा वापर   अमली पदार्थ विकत घेण्यासाठी पेडलर आणि ग्राहक म्हणजे विकत देणारे आणि विकत घेणारे हे पोलिसांच्या किंवा तपासयंत्रणाच्या लक्षात येऊ नये म्हणून कोडवर्डमध्ये एकमेकांशी संवाद साधत आहेत. यासाठी ते व्हाट्सअपवरील इमोजीचा वापर करत आहेत. विशिष्ट अमली पदार्थासाठी विशिष्ट प्रकारच्या इमोजी वापरल्या जात आहेत. एकीकडे अमली पदार्थविरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे अमली पदार्थ खरेदी विक्रीसाठी वेगवेगळ्या  नव्या क्लुप्त्या शोधल्या जात आहेत. त्यामुळे या तस्करांना रोखण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.

पुण्यात चाललंय काय? MPSC तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; धक्कादायक Video आला समोर

कोणत्या अमली पदार्थासाठी कोणती इमोजी?   गांजा 🍀😢 कोकेन 👃😝 MDMA 💊 मशरूम 🍄 हेरॉईन 💉

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात