अनिरुद्ध शुक्ला (बाराबंकी) 24 मार्च : उत्तर प्रदेशचे पोलिस गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी ओळखले जात होते, मात्र बाराबंकी जिल्ह्यात पोलिसांचाच एक नवीन पराक्रम समोर आला आहे. बाराबंकी पोलिसांनी केलेला फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. मॉर्फिन तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात तुरुंगात पाठवण्याची धमकी देऊन 70 वर्षीय व्यक्तीकडून 4 लाख रुपये उकळल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे.
तो व्यक्ती विणकाम करतो या वृद्ध विणकराला बनावट प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून चार लाख रुपये घेतल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तुरुंगात जाण्याच्या भीतीने वृध्द विणकराने नातेवाईकांकडून उसणे पैसे घेऊन कसेतरी चार लाख रुपये पोलिसांना दिले. यानंतर तूला आता काही होणार नाही असे सांगण्यात आलं.
दरम्यान पीडित विणकराने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. सद्यस्थितीत बाराबंकीचे एसपी चौकशीनंतर कारवाई करणार असल्याची चर्चा आहे. वास्तविक हे प्रकरण बाराबंकी जिल्ह्यातील सफदरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रामपूर भवानीपूर गावाशी संबंधित आहे. येथे राहणारे 70 वर्षीय विणकर नुरुल हसन यांनी सफदरगंज पोलिस स्टेशनच्या पोलिसांवर मोठा आरोप केला आहे.
नुरुल हसन म्हणतात की, 23 डिसेंबर 2022 रोजी सफदरगंज पोलिस स्टेशनचे दिवाण यांचा त्यांना फोन आला. त्यांनी उद्या पोलिस स्टेशनमध्ये येऊन भेटण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सफदरगंज पोलिस ठाण्यात गेल्यावर पोलिस स्टेशन प्रभारी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सात लाख रुपयांची मागणी केली. ती रक्काम न दिल्यास एनडीपीएसच्या खोट्या केसमध्ये अडकवण्यात येईल असे सांगण्यात आले.
पीडित विणकर नुरुल हसन यांनी सांगितले की, त्याने व्यवसाय वाढवण्यासाठी बँकेकडून 25 लाखांचे कर्ज घेतले होते. 25 लाखांच्या कर्जाची माहिती मिळाल्यानंतरच सफदरगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी माझ्याविरुद्ध हा कट रचला, असे त्यांनी सांगितले.
पीडित नुरुल हसनने पुढे सांगितले की, पोलिसांनी माझ्यासारख्या अनेकांना आधीच पोलिस ठाण्यात खंडणीसाठी बसवून ठेवले होते. पोलिस स्टेशनचे वातावरण अगदी बाजारासारखे झाले होते. प्रत्येकजण हात जोडून विचारत होती की रक्कम कमी करा.
पीडित नुरुल हसन याने सांगितले की, माझा सौदा चार वर्षांसाठी 50 रुपयांत ठरला होता. पीडितेने सांगितल्यानुसार, त्याने नातेवाइकांकडे पैशांची मागणी करून पोलिसांच्या हातून सुटका करून घेण्यासाठी पोलीस स्टेशन प्रभारी यांच्या उपस्थितीत दिवाण साहेबांना चार लाख रुपये दिले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Up crime news